नवीन पिझ्झा हट मेल्टस् आता भारतात
भारतात सर्वांच्या पसंतीचा आणि विश्वासार्ह पिझ्झा ब्रँड ‘पिझ्झा हट’ने, भारतीय बाजारपेठेतील एका नवीन श्रेणीत प्रवेश करत, जागतिक बेस्टसेलर, मेल्टस् लॉन्च केला आहे. मेल्टस् हा एक बहुआयामी, सोयीस्कर आणि समाधानकारक आहार पर्याय आहे, जो ग्राहकांच्या प्रवासादरम्यान जीवनशैलीची पूर्तता करतो. हा आहार कधीही, कुठेही सेवनासाठी योग्य आहे.
कुरकुरीत, चीजने पुरेपूर आणि भरगच्च स्वरुपातील मेल्ट्समध्ये चवदार फिलिंग, वितळलेले 100% मोझेरेला चीज, चविष्ट सॉस, गुंडाळलेले आणि बटरची चमक आणि भुरभुरलेल्या अद्वितीय मसाल्यांच्या स्वादासह पूर्ण भाजलेले एक पातळ आणि कुरकुरीत कवच आहे. मेल्ट्स जगभर लोकप्रिय आहे. आता खास भारतीय आवडीनुसार ते तयार करण्यात आले आहेत. ज्यामध्ये लोडेड व्हेजी बीबीक्यू, लोडेड चिकन बीबीक्यू, चीझी चीज, चीझी चीज चिकन, मॅजिकल मखनी पनीर आणि चिकन टिक्का आणि कीमा सुप्रीम या सहा आनंददायी प्रकारांचा समावेश आहे.
पिझ्झा हट इंडियन सबकॉन्टीनेंट’चे मॅनेजिंग डायरेक्टर मेरिल परेरा म्हणाले, “भारतात आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या उत्पादनापेक्षा ‘मेल्टस्’ वेगळे आहे. एका नव्या श्रेणीत आमचा प्रवेश आहे. कधीही, कुठेही, कधीही खाण्यास अतिशय सोयीस्कर असा एक बहुआयामी खाद्यपदार्थ बाजारात आणताना आम्हाला आनंद होतो आहे. या पदार्थात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय नसेल, जे नेहमी प्रवासात असतात अशा ग्राहकांना केवळ समाधान देईल. वैविध्यपूर्ण स्वाद आणि उत्तम किंमत सर्व ‘पिझ्झा हट’प्रेमींना नक्कीच आनंदित आणि आश्चर्यचकित करेल. आम्ही त्यांच्या प्रतिसादाची आतुरतेने वाट पाहत आहोत”.
तुम्ही घरी मूव्ही नाईटचा आनंद घेत असाल, कामाच्या ठिकाणी व्यस्त असाल, किंवा फक्त पाक कलेचा आनंद लुटण्याची इच्छा असेल, कुरकुरीत, चटपटीत आणि भारदस्त, मेल्टस् नक्कीच तिथे पोहोचतील. केवळ रु. 169 च्या परवडणाऱ्या किंमतीपासून सुरू होणारे हे मेल्टस् भारतभरातील सर्व 850 + पिझ्झा हट रेस्टॉरंटमध्ये जेवण, वितरण आणि टेकअवेसाठी उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, पिझ्झा हट दोन पर्यायांसाठी 1 आणि 3-कोर्स जेवणासाठी मेल्टस् मील यासारखे रोमांचक मेल्टस् कॉम्बो आणि डीलदेखील देते.
मेल्टस् सोबतच, पिझ्झा हट’ने विविध प्रकारच्या अद्वितीय टॉपिंग संयोजनांसह त्याचे सिग्नेचर आणि बहुप्रतिक्षित थिन एन क्रिस्पी क्रस्ट देखील सादर केले आहे. जे ग्राहकांना आनंद घेण्यासाठी पिझ्झा क्रस्टचे आणखी पर्याय प्रदान करते.
अधिक माहितीसाठी आणि नवीन मेल्टस् चाखण्यासाठी, तुमच्या जवळच्या पिझ्झा हट रेस्टॉरंटला भेट द्या किंवा पिझ्झा हट अॅपद्वारे ऑनलाइन ऑर्डर करा!