google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

कसा आहे सोनीचा एक्सआर प्रोसेसरसह ४के एचडीआर प्रोफेशनल ब्राव्हिया टीव्ही?

मुंबई:

सोनी इंडिया बीझेड५०एल (BZ50L) मालिकेला बाजारात आणून त्यांच्या विस्तृत पोर्टफोलिओमध्ये ४के एचडीआर ब्राव्हिया (4K HDR BRAVIA) डिस्प्लेचा एक नवीन लाइनअप जोडत आहे. जेथे विश्वासार्हता, चित्र गुणवत्ता आणि व्यापक सुसंगतता आवश्यक आहे अशा व्यावसायिक वातावरणासाठी ही मालिका अनुकूल आहे. अतुलनीय प्रतिमा गुणवत्ता व पाहण्याचा विस्तीर्ण अॅंगल अशी वापरकर्त्यांची आवडती वैशिष्ठ्ये, विचारशील व्यावसायिक वैशिष्ठ्ये आणि एक स्मार्ट सिस्टम ऑन अ चिप (SoC) प्लॅटफॉर्म यांसारख्या महत्वाच्या वैशिष्ठ्यांबरोबरच प्रो ब्राव्हिया ही मालिका अक्षरशः वापरकर्त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी एक चमकदार डिस्प्ले प्रदान करते.


सोनी इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. नाकाशिमा तोमोहिरो म्हणाले, “आम्ही आमचे व्यावसायिक ब्राव्हिया (BRAVIA) डिस्प्ले उत्पादने विकसित करत असताना टिकाऊपणाला प्राधान्य देत आमच्या ग्राहकांच्या नवीनतम इच्छा आणि गरजा पूर्ण करण्याचा विचार करत असतो आणि या लाइनअपचा विस्तार करताना ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करून आम्ही तेच केले आहे. प्रोएव्ही वापरकर्ते सोनीच्या व्यावसायिक डिस्प्लेवर त्याच्या पिक्चरची गुणवत्ता, लवचिकता, आकारांची श्रेणी आणि वापरण्यातील सुलभता यामुळे विश्वास ठेवतात आणि आम्हाला माहीत आहे की, आजच्या बदलत्या व्यावसायिक पटलाला पूर्ण करणाऱ्या वैशिष्ठ्यांच्या अपवादा‍त्मक संयोजनासह बाजारात येणाऱ्या या नवीन मालिकेला सुद्धा ते महत्व देतील.”

सोनीचा महत्वाचा बीझेड५०एल (BZ50L) हा सोनीच्या एक्सआर (XR) प्रोसेसिंगसह अतुलनीय चित्र गुणवत्ता आणि मोठ्या आकाराच्या डिस्प्लेमध्ये ७८० निट्स ब्राइटनेस देते: एक्सआर प्रोसेसर (XR Processor) एफडब्ल्यु-९८बीझेड५०एल (९८ इंच) या व्यतिरिक्त ९८ इंच बीझेड५०एल याचे ठळक वैशिष्ठ्य म्हणजे, सोनीच्या व्यावसायिक ब्राव्हिया बीझेड४०जे (BRAVIA BZ40J) मालिकेच्या तुलनेत हे अंदाजे २२% वजनाने कमी आणि बेझेल रुंदी २८% अधिक स्लिम आहे. या मोठ्या मॉडेलला हाताळण्यास व हलवण्यास जास्त सहज करण्यासाठी आणि लावण्यासाठी सोपे करायला याच्या डिस्प्लेच्या तळाशी एर्गोनॉमिक आडवे (हॉरीझॉन्टल), तर वरच्या बाजूला उभे (वर्टीकल) हॅन्डल समाविष्ट केले आहेत.

शाश्वतता आणण्यासाठी या नवीन मॉडेलमध्ये SORPLASTM पुनर्नविनीकरण केलेल्या प्लास्टिकच्या वापर, कमी कचरा निर्मिती व्हावी यासाठी कार्टनवर कमी शाईचा वापर आणि सेटिंग्ज कॉन्फिगरेशनवर आधारित वीज वापर अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी ECO डॅशबोर्ड असे घटक समाविष्ट केले आहेत. या व्यतिरिक्त, २४ तास कार्यरत राहण्याची क्षमता, सहज कॉन्फिगरेशनसाठी प्री-सेट ची केवळ एक स्टेप सेटिंग, मिररिंग क्षमता, कामकाज सुलभ करण्यासाठी प्रोमोड तंत्रज्ञान, एक समान बेझेल डिझाईन,पोर्टेट आणि टिल्ट असे माउंटिंगसाठी हे उपकरण बसविण्यामध्ये लवचिकता आणि मिश्रित डिझाईन हेतुसाठी टाइलिंग आणि साइड लोगो सक्षम करण्यासाठी मल्टी डिस्प्ले इनस्टॉलेशन ही वैशिष्ठ्ये देखील यामध्ये आहेत.

बीझेड५०एल (BZ50L) मालिकेत अधिक लवचिकता आणि वापरण्यास सुलभता यासाठी ३२ जीबी चे वाढलेले अंतर्गत संचयन समाविष्ट आहे. सर्व मॉडेल्समध्ये सुलभ माउंटिंगसाठी नवीन सेंटर अलाइनमेंट रेल किट आहे , तर या ९८ इंच पर्याय केंद्र संरेखित VESA पॅटर्नसह येते. पोर्टफॉलिओमध्ये इन्स्टॉलेशन रिडिझाईनची आवश्यकता नसून सहजपणे योग्य ब्राइटनेस मॉडेल्स निवडण्यासाठी कॉमन चेसिस डिझाईन देखील समाविष्ट केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!