
चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी चीननं आणलं DeepSeek
एआयच्या मदतीने एका तासात होणारे काम अवघ्या 5 मिनिटांत होत आहे. चॅट जिपीटी, मेटा एआय हे एआय जगतातील अग्रणी मानले जातात. मात्र या सर्वांचीच झोप उडवणारी एआय यंत्रणा चीनने आणली आहे. चीनन या यंत्रणेला डीपसिक (DeepSeek) असं नाव दिलंय. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान येताच आता चॅट जीपीटीसारख्या एआय यंत्रणांची झोप उडाली आहे.
चीनी एआय मॉडेल DeepSeek AI ने तंत्रज्ञानस्नेही तसेच कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रात काम करणाऱ्यांचे लक्ष स्वत:कडे ओढून घेतले आहे. अॅप स्टोअरवर तर या डीपसीकने ओपन एआय या कंपनीच्या चॅट जीपीटीलाही मागे टाकलं आहे. डीपसीकने दिलेल्या सुविधांकडे संपूर्ण जग आकर्षित झाले असून चॅट जीपीटी, मेटा एआय या सारख्या कृत्रिम बुद्धीमत्तेवर काम करणाऱ्या प्लॅटफॉर्मसची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे चीनी कंपनीने विकसित केलेला हा डीपसीक एआय मंच तुम्हाला तुमच्या मोबाईल तसेच लॅपटॉपवरही वापरता येणार आहे.
मूळच्या चीनच्या कंपनीने तयार केलेले DeepSeek R1 हे ओपन सोअर्स एआय मॉडेल आहे. या एआय तंत्रज्ञानाचा परवाना सध्या मॅसाच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) या संस्थेकडे आहे. तुम्हाला येणाऱ्या कुठल्याही अडचणींवर उत्तर शोधण्यासाठी हा एक खुला आणि मोफत असा मंच आहे. यावर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक तसेच कार्यालयीन समस्यांवर उत्तर शोधू शकतात. तुम्ही प्ले स्टोअरवरून तसेच आयओएस स्टोअरवरून हे अॅप इन्स्टॉल करू शकता.