
‘प्रोजेक्ट्स टुडे’चा एआय-आधारित नवा व्यावसायिक संधी प्लॅटफॉर्म
मुंबई : भारतातील प्रकल्प क्षेत्र अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘प्रोजेक्ट्स टुडे’ने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित नवा व्यावसायिक संधी प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे प्रकल्पांची सविस्तर माहिती, निविदा, सर्वात कमी बोली (एल-१), ऑर्डर्सचे अद्ययावत तपशील तसेच संबंधित महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कंपन्यांना योग्य वेळी संबंधित प्रकल्पांशी जोडले जाणे अधिक सोपे होईल.
नव्या प्लॅटफॉर्ममध्ये व्यावहारिक परिणामांवर लक्ष केंद्रित करणारे एआय तंत्रज्ञान समाविष्ट करण्यात आले आहे. बीओक्यू शोध, उप-प्रकल्पांचा मागोवा, निविदेपासून ऑर्डरपर्यंतचा संपूर्ण प्रवास, तसेच बोलीदारांची माहिती अशा सुविधा यात उपलब्ध आहेत. याशिवाय व्यावसायिक संधींचा अंदाज घेण्यासाठी विश्लेषण साधने, विश्वासार्हता तपासण्यासाठी डॅशबोर्ड आणि संबंधित निर्णयकर्त्यांशी संपर्क साधण्याची यंत्रणा देण्यात आली आहे. यामुळे कंपन्यांना केवळ चालू घडामोडींची माहिती मिळणार नाही, तर पुढील धोरणात्मक निर्णय घेणेही सुलभ होणार आहे.
२५ वर्षांहून अधिक संशोधनाचा अनुभव असलेल्या ‘प्रोजेक्ट्स टुडे’कडे सध्या देशभरातील ५० हजारांहून अधिक सक्रिय प्रकल्पांची माहिती उपलब्ध आहे. हे प्रकल्प नियोजन, निविदा किंवा अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर आहेत. दरमहा सुमारे १,५०० नवीन प्रकल्प आणि १० हजारांहून अधिक निविदांची भर या प्लॅटफॉर्मवर पडते. तसेच, दरमहा १,२०० पेक्षा जास्त एल-१ बोली आणि ऑर्डर्सचे अद्यतन दिले जाते, ज्यामुळे विविध क्षेत्रांतील कंपन्यांना अचूक व्यावसायिक निर्णय घेण्यास मदत होते.
-
२५०० नव्या सरकारी नोकऱ्या भरण्याची घोषणाMarch 7, 2026
या उपक्रमाचा उद्देश केवळ माहिती उपलब्ध करून देणे नसून, प्रकल्प क्षेत्रातील प्रमोटर्स, कंत्राटदार, सल्लागार, पुरवठादार, सेवा पुरवठादार आणि वित्तसंस्था यांच्यात संधींचा अखंड प्रवाह निर्माण करणे हा आहे. ‘ग्राहक प्रथम, राष्ट्र सदैव’ या तत्त्वावर आधारित हा उपक्रम भारताच्या प्रकल्प अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे. योग्य वेळी सहभाग, प्रभावी समन्वय आणि अंमलबजावणीचा वेग वाढवून प्रकल्पांचे प्रत्यक्ष परिणामांमध्ये रूपांतर व्हावे, हा या प्लॅटफॉर्ममागील मुख्य हेतू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.






