google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

ओपनएआय किंवा गुगल नव्हे, ‘हा’ भारतीय एआय ठरला जगात अव्वल…

भारतपे चे माजी मुख्य उत्पादन अधिकारी अंकुर जैन आणि रेड्डी व्हेंचर्सचे अध्यक्ष GV संजय रेड्डी यांनी सह-स्थापना केलेल्या जीवी या भारतीय आरोग्य सेवा एआय स्टार्टअपने विकसित केलेल्या उद्देश प्रणीत मेडिकल लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) ला ओपन मेडिकल एलएलएम लीडरबोर्डवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. जीवी चे LLM, जीवी MedX ने प्रस्थापित LLMs ला मागे टाकले आहे. त्यामध्ये लीडरबोर्डच्या नऊ बेंचमार्क श्रेणींमध्ये 91.65 च्या सरासरी स्कोअरसह OpenAl चे GPT-4 आणि Google चे Med-PaLM 2 यांचा समावेश आहे.


अग्रगण्य एआय प्लॅटफॉर्म हगिंग फेस, एडिनबर्ग विद्यापीठ आणि ओपन लाइफ सायन्स एआय द्वारे होस्ट केलेल्या लीडरबोर्डवर वैद्यकीय-विशिष्ट LLM ची क्रमवारी परीक्षा आणि संशोधनातील वैद्यकीय प्रश्नांची उत्तरे देण्याच्या कामगिरीवर आधारित आहे. मूल्यमापनामध्ये भारतीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा (AIIMS आणि NEET), US वैद्यकीय परवाना परीक्षा (USMLE) तसेच वैद्यकीय ज्ञान, वैद्यकीय अनुवांशिकता आणि व्यावसायिक औषधशास्त्र यासारख्या क्षेत्रातील तपशीलवार मूल्यांकनांचा समावेश आहे.


“उच्च गुणवत्तापूर्ण सेवा 24/7 उपलब्ध करून देत जीवी जनरेटिव्ह एआय द्वारे प्राथमिक आरोग्य सेवेत क्रांती घडवत आहे. रुग्णांना देण्याची आरोग्य सेवा उंचावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे हे जीवी मधील आमचे ध्येय आहे. आमचा प्लॅटफॉर्म निदान आणि उच्च अचूकता सुनिश्चित करतो आणि सर्वांसाठी वेळेवर आणि अचूक उपचार सुनिश्चित करतो,” असे जीवी चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुर जैन म्हणाले.


जीवी सध्या फिजिशियन, सर्जन, एआय इंजिनिअर्स आणि डेटा सायंटिस्ट यांच्या २० सदस्यीय टीमसह कार्यरत आहे. हे जागतिक स्तरावर आरोग्यसेवेची सुलभता, परवडणारी क्षमता आणि गुणवत्ता यांसाठी तंत्रज्ञान विकसित करत आहे.

“भारतीय कंपनीसाठी ही एक अविस्मरणीय कामगिरी आहे. जागतिक स्तरावर प्रत्येकासाठी सर्वोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे जीवी येथे आमचे ध्येय आहे. आमचे LLM जगभरातील सर्वोत्कृष्ट असल्याने आम्हाला खूप अभिमान आणि आत्मविश्वास मिळाला आहे. एक अब्जाहून अधिक लोकांपर्यंत जीवी पोहोचविण्याची तयारी आम्ही  करत आहोत,” असे जीवी चे सह-संस्थापक आणि अध्यक्ष जीव्ही संजय रेड्डी म्हणाले.

जीवी आपल्या जीवी MedX LLM ला प्रशिक्षित करण्यासाठी लाखो वैद्यकीय संशोधन पेपर्स, जर्नल्स, क्लिनिकल नोट्स आणि इतर स्त्रोतांचा समावेश असलेला त्यांचा मोठा वैद्यकीय डेटासेट वापरते. हा डेटासेट जगातील सर्वात मोठया डेटासेट मधील एक आहे. जीवी MedX ला ऑड्स रेशो प्रेफरन्स ऑप्टिमायझेशन (ओआरपीओ) नावाच्या इंस्ट्रक्शन फाइन-ट्यूनिंग अल्गोरिदमचा वापर करून प्रशिक्षण देण्यात आले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!