HDFC ने आणला ‘हा’ सुपर विमा
मुंबई:
भारतातील आघाडीच्या आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एचडीएफसी लाइफने क्लिकटूप्रोटेक्ट सुपर (Click2Protect Super) या नावाची मुदत विमा योजना आणली आहे. यामध्ये ग्राहकांच्या संरक्षणविषयक गरजांनुसार कस्टमायझेशन करणे शक्य आहे आणि ग्राहकांना यात केवळ त्यांनी निवडलेल्या लाभ/पर्यायांसाठीच पैसे द्यावे लागतील.
क्लिकटूप्रोटेक्ट सुपर ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, व्यक्तिगत, शुद्ध जोखीम प्रीमियम/बचत आयुर्विमा योजना असून, आयुर्विमा संरक्षण (लाइफ कव्हर) बदलणे, पॉलिसीची मुदत वाढवणे, अपघाती मृत्यू व असाध्य आजारासाठी संरक्षण मिळवणे आदी लवचिकता पुरवते आणि ग्राहकाला आजपर्यंत कधीही मिळाले नव्हते असे खरेखुरे स्वातंत्र्य देते.
ही योजना तुमच्या कुटुंबाला सर्वसमावेशक आर्थिक संरक्षण देते. लाइफ, लाइफ प्लस आणि लाइफ गोल या तीन पर्यायांमधून तुमच्या आवश्यकतांना सर्वाधिक अनुकूल असलेली योजना तुम्ही निवडू शकता.
आपण या सर्व पर्यायांची व त्याद्वारे पुरवल्या जाणाऱ्या लाभांची माहिती घेऊ:
लाइफ ऑप्शन: ही योजना तुम्हाला तुम्ही निवडलेल्या मुदतीसाठी आयुष्य संरक्षण (लाइफ कव्हर) पुरवते आणि त्यायोगे तुमच्या जवळच्या व्यक्तींचे भवितव्य सुरक्षित राहते. या स्मार्ट पर्यायामध्ये असाध्य आजार संरक्षणाचा अंगभूत लाभ आहे आणि तुम्ही नसताना तुमच्या कुटुंबाला आर्थिक स्वातंत्र्य मिळावे या दृष्टीने योजनेची रक्कम वाढवण्याची मुभाही यात तुम्हाला दिली जात आहे.
या पर्यायाचे महत्त्वपूर्ण लाभ पुढीलप्रमाणे आहेत:
२०० टक्क्यांपर्यंत वाढत जाणारा डेथ बेनिफिट निवडण्याचा पर्याय
गंभीर आजाराचे निदान झाल्यास हप्ता माफ जोडीदारासाठी अतिरिक्त संरक्षण निवडण्याचा पर्याय
हप्त्याच्या परताव्याचा पर्याय स्मार्ट एग्झिट पर्यायाच्या माध्यमातून पॉलिसी रद्दीकरणाच्या वेळी आधारभूत हप्ता (बेस प्रीमियम) परत घेण्याचा पर्याय वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत, असाध्य आजाराचे निदान झाल्यास मृत्यू लाभाचे (डेथ बेनिफिट) गतिवर्धन (अॅक्सलरेशन) संपूर्ण व कायमस्वरूपी विकलांगता आल्यास हप्ता माफ मृत्यू लाभ हप्त्यांमध्ये प्राप्त करण्याचा पर्याय.