google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सची उत्क्रांती आणि भवितव्य

ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सपूर्वी शेअर बाजार फक्त काही लोकांना सहजसाध्य होता. परंतु वेगवान डिजिटायझेशन आणि स्मार्टफोनचा वापर यांच्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या तसेच त्यापलीकडील शहरांमध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणुका शक्य होत आहेत. आर्थिक वर्ष २२ मध्ये दर महिन्याला सुमारे २९ लाख नवीन डिमॅट खाती उघडली जात आहेत. ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सची उत्क्रांती आणि भवितव्य याबद्दल सांगताहेत एंजेल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी.

 

ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सचे डिजिटायझेशन:
ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या उत्क्रांतीत डिजिटायझेशन आघाडीवर आहे. २०१० मध्ये अॅपवर आधारित ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स आल्यापासून ब्रोकिंग हाऊसेसनी मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूकदारांना सेवा देण्यासाठी डिजिटल होण्यास सुरूवात केली आहे. त्यांना बाजारातील किंमतीवर लक्ष ठेवण्यासाठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म म्हणून आणण्यात आले होते. त्यानंतर गुंतवणूकदारांना स्टॉकचे पर्याय खरेदी करून विकण्यासाठी आणि राखून ठेवण्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला. डिजिटायझेशन अंमलात आल्यापासून ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स हे विविध प्रकारच्या गुंतवणूक पर्यायांसाठी वन स्टॉप स्थान ठरले आहे. त्यात बॉन्ड्स, करन्सी, स्टॉक, कमॉडिटी आणि इतर वित्तीय मालमत्तांचा समावेश आहे.

डिमॅट अकाऊंट उघडण्यापासून ते व्यापार करेपर्यंत आणि गुंतवणूक पोर्टफोलिओ राखेपर्यंत वेब आणि मोबाइलवर आधारित अॅप्लिकेशन्सनी ट्रेडिंग आजच्या तंत्रज्ञान सुसंगत व्यक्तींसाठी सुलभ केले आहे. त्यामुळे मिलेनियल्स आणि जेन झेड यांचा सहभाग वाढला आहे.

 

सहभाग वाढवणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना:
नवीन युगाच्या तंत्रज्ञानाचा टप्प्याटप्प्याने अंगीकार केल्यामुळे वापरकर्ता अनुभव खूप चांगला झाला आहे. त्यामुळे शेअर बाजारातील रिटेल वापरही वाढला आहे. एआयने युक्त डिजिटल ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स रिटेल गुंतवणूकदारांना संशोधन करणे, शोधणे, समजून घेणे आणि माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेणे शक्य करतात. एआयला वापरकर्त्यांना व्यापारासाठी अत्यंत वाजवी दरात मदत करण्यासाठी जास्तीत-जास्त ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सकडून वापरले जात आहे. तांत्रिक सुधारणा आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सचा एपीआय समावेश हे काही महत्त्वाचे घटक आहेत, जे नवीन युगाच्या गुंतवणूकदारांच्या रिटेल सहभागावर सातत्याने प्रभाव टाकतात. २०२१ मध्ये जागतिक ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची बाजारपेठ ८ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. त्याचबरोबर आजच्या काळातील ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स अद्ययावत ट्रेडिंग वैशिष्टे देतात, ज्यामुळे समृद्धी निर्मितीचा प्रवास सहजसुलभ होतो.

 

पुढील मार्गक्रमणा:
वित्तीय बाजारपेठेतील वाढता सहभाग अन्यथा पुरेशी सेवा नसलेल्या बाजारपेठांसाठी गुंतवणूक सहजसाध्य करण्यासाठी नवीन उत्पादने आणि सेवा आणणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या वाढीला प्रोत्साहन देत आहेत. अलीकडच्या काळात सर्व वित्तीय सेवांना वन स्टॉप प्लॅटफॉर्म देणारे प्लॅटफॉर्म्स नवीन युगाच्या गुंतवणूकदारांकडून वापरले जातात. यामुळे वापरकर्त्यांना शेअर बाजारातील ट्रेडिंगपासून, एफडी आणि कर्ज घेण्यासाठी म्युच्युअल फंड्स अशा विविध गोष्टींच्या सुविधा देतात.

 

आपण पुढे जात असताना डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील एक बदलता प्रवाह म्हणजे एआय ऊर्जायुक्त चॅटबोस्ट आहेत, जे नवीन आणि नियमित गुंतवणूकदारांना वित्तीय बाजारपेठांच्या अपडेट्सच्या सुविधा देतात. डिजिटल ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्समध्ये सातत्याने बदल होत असताना ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची बाजारपेठ २०२८ मध्ये २०२१ ते २०२८ या कालावधीत ५.१ टक्के सीएजीआरने १२ अब्ज डॉलरपेक्षा जास्त होईल अशी अपेक्षा आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!