google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

मॅसेज ओपन न करता ‘असा’ ब्लॉक करा whatsapp नंबर

ऑनलाईन फसवणूकीचे आकडे काही कमी होताना दिसत नाही. रिपोर्टनुसार, अनोळखी क्रमांकावरुन येणारे कॉल आणि मॅसेज यांच्यावर विश्वास ठेऊन अनेक जण लाखो रुपये गमवतात. सायबर भामट्यांचा अजून एक खास अड्डा, WhatsApp हे आहे. व्हॉट्सअप अनेक प्रकारच्या सुरक्षा सुविधा पुरविते. पण तरीही अनेक लोक या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतातच. त्यामुळे व्हॉट्सअपने वापरकर्त्यांसाठी खस सुरक्ष कवच आणले आहे. त्यानुसार, फोन लॉक असला तरी, नोटिफिकेशनच्या माध्यमातून युझर अशा अनोळखी माणसाचा नंबर ब्लॉक करु शकतात.

जर एखादा आमिष दाखविणारा, संशयास्पद मॅसेज आला आणि त्यात फसवणुकीचा संशय आला तर हा क्रमांक तुम्हाला झटपट ब्लॉक करता येईल. नोटिफिकेशन आल्यानंतर, युझर्सला उत्तर देण्याच्या बटनाजवळच आता “ब्लॉक” बटनाची सुविधा देण्यात येणार आहे. तुमचा मोबाईलला स्क्रीन लॉक असला तरी नोटिफिकेशन मिळताच तुम्हाला हा अनोळखी क्रमांक लॉक करता येईल.

यापूर्वी WhatsApp ने ब्लॉक आणि रिपोर्टचा पर्याय दिला आहे. पण अनेकदा अनोळखी व्यक्तीकडून मॅसेज आल्यास त्याला ब्लॉक करण्यासाठी चॅट उघडावे लागत होते. पण अनेकदा मॅसेज वाचल्यावर युझर्स त्या व्यक्तीला ब्लॉक करण्याचे विसरुन जात होते. अथवा त्याकडे दुर्लक्ष करत होते. पण आता नवीन फीचरमुळे युझर्सला थेट नोटिफिकेशन पाहूनच स्पॅम मॅसेज ब्लॉक करता येणार आहे. त्यासाठी फोनचे लॉक उघडण्याची गरज नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!