google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

जॉन्सन्स म्हणतेय, ‘प्रॉमिस, पहले पल से’

लहान बाळांच्या त्वचेची देखभाल करणाऱ्या उत्पादनांच्या क्षेत्रातील प्रवर्तक, जॉन्सन्स® बेबीने आपले ‘प्रॉमिस, पहले पल से’ (अर्थात ‘वचन, पहिल्या क्षणापासून’) अधोरेखित करण्यासाठी आपल्या बेबी स्किनकेयर उत्पादनांच्या श्रेणीमध्ये १००% इंग्रिडियंट पारदर्शकता दर्शवली आहे.

या नव्या लॉन्चमुळे उत्पादनांच्या आत काय आहे, त्यांचे उपयोग आणि उपयुक्तता तसेच बाळांसाठी सुरक्षित इंग्रिडियंट व त्यांची समर्पकता समजून घेणे मातांसाठी सोपे होईल, नव्या पालकांना माहितीपूर्ण निर्णय घेता येतील व आपल्या बाळांसाठी योग्य उत्पादने निवडता येतील.

उत्पादनांमधील १००% बेबी सेफ इंग्रिडियन्टसची माहिती मातांना करून घेता यावी यासाठी जॉन्सन्स बेबीने संपूर्ण जगभरात पहिल्यांदाच ऑगमेंटेड रियालिटी इनोव्हेशन सादर केले आहे. कोणत्याही शहरातील प्रमुख रिटेल आउटलेटमध्ये जाऊन AR वापरून रीयल टाइम इंटरॅक्टिव्ह अनुभव घेता येईल आणि जॉन्सन्स® बेबी उत्पादनांच्या आत काय आहे, कोणती इंग्रिडियंट वापरली गेली आहेत व त्यांची नेमकी भूमिका काय ते पाहता व समजून घेता येईल. या लॉन्चमुळे भारत ही संपूर्ण जगभरातील पहिली बाजारपेठ ठरली आहे जिथे जॉन्सन्स® बेबीच्या सर्व प्रमुख उत्पादनांच्या बाबतीत AR इनोव्हेशनचा अनुभव घेता येईल. त्यानंतर संपूर्ण जगभरात याचा प्रसार केला जाईल.


गेल्या महिन्यात जॉन्सन्स® बेबीने ‘प्रॉमिस, पहले पल से’ हे आपले नवे मार्केटिंग कॅम्पेन सुरु केले. ‘फक्त आणि फक्त बाळासाठी सुरक्षित इंग्रिडियंट’ पासून बनवण्यात आलेल्या उत्पादनांच्या मदतीने, बाळाच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून बाळाच्या नाजूक त्वचेचे संरक्षण करण्यात मदत करण्याची ब्रँडची बांधिलकी या कॅम्पेनमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून पालकांसोबत घनिष्ठ नाते जोडून असलेला ब्रँड या नात्याने, जॉन्सन्स® बेबीने बाळाच्या त्वचेचे पहिल्या दिवसापासून रक्षण करण्यात मदत करण्याची वचनबद्धता स्वीकारली आहे.

जॉन्सन्स® बेबीच्या AR इनोव्हेशनसह या ब्रँडने आई व बाबांना बाळाच्या त्वचेच्या रक्षणासाठी माहितीपूर्ण निर्णय घेण्यात सक्षम बनवून त्यांच्या पालकत्वाच्या प्रवासात मोलाची साथ दिली आहे.
बाळांसाठी सर्वात सुरक्षित उत्पादने निर्माण करण्याच्या मिशनला अनुसरून, जॉन्सन्स® बेबीने अनेक दशकांचे ज्ञान व विज्ञान यांच्या साहाय्याने बाळाच्या नाजूक त्वचेचे रक्षण करण्यात मदत करण्यासाठी ‘ओन्ली बेबी सेफ’ (बाळांच्या त्वचेसाठी सुरक्षित अशीच इंग्रिडियंट्स) निवडण्यासाठी एक मजबूत पाया निर्माण केला आहे. फक्त सर्वात सुरक्षित इंग्रिडीयंट्स निवडून सर्वात प्रगत फॉर्म्युला निर्माण करून बाळाची अधिकाधिक चांगली देखभाल करता यावी यासाठी हा ब्रँड सातत्याने प्रयत्नशील असतो.

व्यक्तिगत देखभाल उद्योगक्षेत्रात वापरले जाणारे फक्त २% इंग्रिडीयंट्स जॉन्सन्स® बेबीची, बाळाच्या देखभालीसाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमधील सुरक्षितता व शुद्धता यांची जागतिक मानके पूर्ण करू शकतात. त्यांची उत्पादने काटेकोर वैज्ञानिक संशोधनाच्या साहाय्याने तयार करण्यात येतात. त्यांचे फॉर्म्युले डॉक्टरांनी (पेडियाट्रिशियन्स आणि डर्मेटोलॉजिस्ट्स) तपासलेले असतात, तसेच त्यामध्ये पॅराबेन्स, सल्फेट्स, डाय इत्यादी हानिकारक रसायने नसतात.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!