Goa Mining: चार ब्लॉक्ससाठी 24 कंपन्या शर्यतीत
गोव्यातील लोह खनिजाच्या चार ब्लॉक्सची लिलाव प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करण्याचा गोवा सरकारचा प्रयत्न आहे. याबाबत सरकारने कमालीची गुप्तता बाळगली आहे. गोवा सरकारने खाण चार ब्लॉक्सच्या लिलाव प्रक्रियेसाठी निविदा काढली आहे. आज झालेल्या लिलाव पूर्व बोली परिषदेला 24 कंपन्यांची हजेरी लावली.
मिळालेल्या माहितीनुसार खाण खात्याने लिलावासाठी निविदा काढली होती. याला 24 खाण कंपन्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. यामध्ये गोव्यासह शेजारील राज्यातील अनेक कंपन्यांचा समावेश आहे. याबाबत बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही प्रक्रिया डिसेंबर पर्यंत पुर्ण होऊन खाण काम सुरु होईल अशी माहिती दिली आहे.
आठ लोह खनिज खाणींचा समावेश असलेले चार ब्लॉक्स पहिल्या टप्प्यात लिलावात काढण्यात येणार आहेत. मिनरल एक्स्प्लोरेशन कार्पोरेशनने आपल्या अहवालात डिचोली व सत्तरी तालुक्यातील आठ खाणींचा लिलाव करता येणे शक्य असल्याचे नमूद केले आहे.