google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘ओला’ची #EndICEAge च्‍या दिशेने मोठी झेप…

बंगलोर:

ओला इलेक्ट्रिक या भारतातील अग्रगण्‍य इलेक्ट्रिक वेईकल्‍स कंपनीने आज नवीन ओला एसआय एअरच्‍या लॉन्‍चसह भारताला पेट्रोल वेईकल्‍सच्‍या युगाचा शेवट करण्‍याच्‍या जवळ घेऊन घेण्‍याच्‍या दिशेने मोठी झेप घेतली आहे. जागतिक दर्जाची इलेक्ट्रिक स्‍कूटर कंपनी असण्‍यासाठी स्‍थापना करण्‍यात आलेल्‍या ओलाच्‍या एसआय पोर्टफोलिओचे नवीन विस्‍तारीकरण भारतातील ईव्‍ही क्रांतीला जनतेपर्यंत घेऊन जाईल.


नवीन एआय एअर एसआय व्‍यासपीठावर निर्माण करण्‍यात आली आहे आणि तीच अत्‍याधुनिक डिझाइन कायम ठेवण्‍यात आली आहे. पण ओेलाने पॉवरट्रेन व बॅटरी पॅकची पुनर्रचना केली आहे. २.५ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅक आणि ४.५ केडब्‍ल्‍यू हब मोटरची शक्‍ती असलेल्‍या एसआय एअरचे वजन फक्‍त ९९ किग्रॅ आहे. या स्‍कूटरची सर्वोच्‍च गती ८५ किमी/तास आहे आणि फक्‍त ४.३ सेकंदांमध्‍ये ० ते ४० किमी/तास गती प्राप्‍त करते. ही स्‍कूटर इको मोडमध्‍ये १०० किमी आयडीसी रेंज प्राप्‍त करते, ज्‍यामुळे ही परिपूर्ण शहरी स्‍कूटर आहे.

नवीन एसआय एअरमध्‍ये २ टोन बॉडी कलर स्किमसह नवीन व आकर्षक डिझाइनची भर करण्‍यात आली आहे. ही स्‍कूटर कोरल ग्‍लॅम, निओ मिंट, पोर्केलेन व्‍हाइट, जेट ब्‍लॅक आणि लिक्विड सिल्‍व्‍हर या ५ रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे. दर्जात्‍मक तंत्रज्ञान, डिझाइन व कार्यक्षमतेसह, तसेच आधुनिक ओएस अपडेट्ससह ओला एसआय एअर दिवाळीला किंवा दिवाळीपूर्वी म्‍हणजेच २४ ऑक्‍टोबर २०२२ रोजी किंवा त्‍यापूर्वी ९९९ रूपयांमध्‍ये स्‍कूटर रिझर्व्‍ह करणाऱ्या प्रत्‍येकासाठी ७९,९९९ रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किंमतीमध्‍ये येईल. ओला एसआय एअरच्‍या खरेदीला फेब्रुवारी २०२३ मध्‍ये सुरूवात होईल आणि डिलिव्‍हरींना पुढील वर्षी एप्रिल महिन्‍यापासून सुरू होईल.


ओलाने वर्षभरात त्‍यांचे तिसरे प्रमुख सॉफ्टवेअर अपगेड मूव्‍हओएस ३ ची घोषणा देखील केली आहे. आधुनिक ओव्‍हर-द-एअर अपग्रेडमध्‍ये २० अधिक नवीन वैशिष्‍ट्यांची भर करण्‍यात आली आहे आणि कार्यक्षमतेमध्‍ये अनेक सुधारणांसह येते. मूव्‍हओएस ३ मध्‍ये नवीन लॉन्‍च करण्‍यात आलेली काही वैशिष्‍ट्ये आहेत प्रोक्झिमिटी अनलॉक, पार्टी मोड, मूड्स आणि ओलाच्‍या हायपरचार्जर नेटवर्कशी कॉम्‍पॅटीबिलिटी. ओला हायपरचार्जर्ससह वापरकर्ते आता प्रतिमिनिट ३ किमी चार्जिंग गतीमध्‍ये १५ मिनिटांमध्‍ये जवळपास ५० किमीपर्यंत त्‍यांच्‍या स्‍कूटर्स चार्ज करू शकतील. याव्‍यतिरिक्‍त नवीन मूव्‍हओएस ३ अपडेटमध्‍ये अनेक अधिक उत्‍साहवर्धक वैशिष्‍ट्ये सादर करण्‍यात येतील, जसे हिल होल्‍ड, प्रोफाइल्‍स व वेकेशन मोड. २५ ऑक्‍टोबरपासून मूव्‍हओएस ३ बीटा व्‍हर्जन ओला वेबसाइटवर साइनअपसाठी सर्व ओला एसआय मालकांसाठी खुले करण्‍यात येईल, त्‍यानंतर डिसेंबरमध्‍ये जनतेसाठी सादर करण्‍यात येईल. तुम्‍ही येथे व्हिडिओजवर मूव्‍हओएस वैशिष्‍ट्ये पाहू शकता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!