google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजीगोवा

फेदरलाइटचे गोव्यात नवीन एक्सपिरीयन्स सेंटर 

कामाच्या ठिकाणच्या फर्निचरमध्ये अग्रणी नाव असलेल्या फेदरलाइटने, वर्कस्पेस डिझाइनमधील नवनवीन डिझाइन आणि ट्रेंड प्रदर्शित करण्यासाठी, समर्पित असलेल्या त्यांच्या विशेष एक्सपिरीयन्स सेंटरच्या भव्य उद्घाटनाची घोषणा केली आहे. कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे गोवा सरकारचे पर्यटन आणि आयटी मंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांच्या हस्ते या सेंटरचे उदघाटन झाले.

गोव्यात पर्वरी येथे महालक्ष्मी चेंबर्स, एचडीएफसी बँकेच्या वर, एनएच६६ येथे स्थित हे अत्याधुनिक सुविधा देणारे शोरूम ४,००० चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले आहे. आधुनिक व्यवसाय, शैक्षणिक संस्था आणि हॉटेल्सच्या, बदलत्या फर्निचर गरजा पूर्ण करणाऱ्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी येथे उपलब्ध आहे.

फेदरलाइटचे एक्सपिरीयन्स सेंटर हे केवळ शोरूमपेक्षा, अधिक असल्याचे दिसते. ते डिझाइनमधून घेतलेली प्रेरणा आणि कल्पनांचे केंद्र आहे. या शोरुममध्ये उंची समायोजित करण्यायोग्य वर्कस्टेशन्सपासून ते मीटिंग पॉड्सपर्यंत आणि आधुनिक वर्कस्टेशन्सपासून ते खुर्च्या आणि सॉफ्ट-सीटिंगपर्यंत सर्व पर्याय आहेत. अभ्यागतांना येथे वर्कस्पेस फर्निचरमधील विस्तृत पर्यायांचा शोध घेता येईल, जे कोणत्याही कामाच्या ठिकणाला सर्जनशीलता आणि उत्पादकतेच्या केंद्रात बदलू शकते.

या स्टोअरमध्ये फर्निचर सोल्यूशन्सची विस्तृत श्रेणी काटेकोरपणे प्रदर्शित केली आहे. क्लायंट, आर्किटेक्ट आणि डिझायनर्स, व्यवसायिक, मालक आणि व्यवस्थापकांना त्यांचे ब्रँड प्रतिबिंबित करणाऱ्या कामाच्या जागा तयार करण्यासाठी प्रेरित करणे, हे या कंपनीचे उद्दिष्ट आहे. यामुळे कामाची संस्कृती आणि वातावरणातील बदलांना प्रतिसाद मिळाल्याने यश आणि नावीन्याला देखील चालना मिळते.

या शोरूमचे उद्घाटन रोहन खंवटे, पर्यटन आणि आयटी मंत्री तथा पर्वरीचे आमदार, अरुण चेल्लाराम, फेदरलाइट ग्रुपचे कार्यकारी संचालक आणि ग्यानेंद्र सिंग परिहार व्यवसाय प्रमुख – फेदरलाइट ग्रुपचे डीलर व्यवस्थापन यांनी केले.

उद्घाटनप्रसंगी माध्यमांशी बोलताना अरुण चेल्लाराम म्हणाले, कि ‘आमच्या नवीन शोरूमच्या माध्यमातून गोव्याची अधिक प्रभावीपणे सेवा करता येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही कॉर्पोरेट्स, लघु उद्योगांचे मालक, उद्योजक आणि सार्वजनिक व सरकारी क्षेत्रांना, गोव्यातील या नवीन एक्सपिरीयन्स सेंटरला भेट देण्यासाठी आणि फेदरलाइट ज्या अत्याधुनिक डिझाइन व नाविन्यपूर्ण उपायांसाठी प्रसिद्ध आहे, त्याचा शोध घेण्यासाठी आमंत्रित करतो.”

रमणिय भूप्रदेश आणि उत्साही पर्यटन उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले गोवा राज्य, भारतातील एक गतिमान औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून देखील उदयास येत आहे. पश्चिम किनाऱ्यावरील राज्याचे धोरणात्मक असे स्थान, मुरगाव बंदर आणि दाबोळी विमानतळाद्वारे उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय जोडणी प्रदान करते, ज्यामुळे राज्यात अखंड व्यापार आणि वाणिज्य सुलभ होते.

गोव्याच्या मजबूत पायाभूत सुविधा, गुंतवणूक-अनुकूल धोरणे आणि स्थापित औद्योगिक वसाहतींनी माहिती तंत्रज्ञान, फार्मास्युटिकल्स आणि उत्पादन यासारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित केली आहे. याव्यतिरिक्त, राज्याने दर्जेदार शिक्षणावर भर दिल्याने असंख्य संस्थांची येथे स्थापना झाली आहे, ज्यामुळे औद्योगिक विकासाला पाठिंबा देणारे कुशल असे कार्यबळ निर्माण होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!