
गोवा
नॉलेज टर्मिनसच्या अध्यक्षपदी उर्वशी नायक बिनविरोध
नव्या कार्यकारिणीची आणि सल्लागार मंडळाची घोषणा
फोंडा :
राज्याचा ज्ञान महोत्सव मानला जाणाऱ्या परिक्रमाचे आयोजन करणाऱ्या नॉलेज टर्मिनस संस्थेच्या नव्या कार्यकारी मंडळाची नुकतीच निवड करण्यात आली. यामध्ये उर्वशी नायक यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर संस्थेच्या नव्या कार्यकारी मंडळाची निवड आणि सल्लागार मंडळाचीदेखील यावेळी घोषणा करण्यात आली.
नॉलेज टर्मिनसच्या या तीन वर्षासाठीच्या नव्या कार्यकारिणीमध्ये उर्वशी नायक यांच्या अध्यक्षतेखाली रोहित खांडेकर (सचिव), दिवीक्षा कामत (खजिनदार), तेजस रिवणकर (उपाध्यक्ष), प्रद्युम नाईक (सहसचिव), विनीत कुंडईकर (सह खजिनदार), तर सदस्य म्हणून महेश गावडे, गौरी गांवकर, विद्येश पाडियार यांची बहुमताने निवड करण्यात आली. फोंड्यात नुकत्याच झालेल्या विशेष कार्यक्रमात नव्या कातकरी मंडळाने अधिकृतरीत्या आपला कार्यभार हाती घेतला.

याचप्रमाणे संस्थेच्या सल्लागार मंडळावर जितेंद्र शिकेरकार, परेश नाईक, लकी गावडे, उपेंद्र साळगांवकर यांची आणि सल्लागार सदस्य म्हणून शिवानी गांवकर, प्रणिता सावंत, आदित्य शेटकर, निहाल कुंकळकर, तन्मय शिंदे, नेहल प्रियोळकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे परिक्रमाच्यावतीने सांगण्यात आले.