google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘रावणफोंड – पॉवर हाऊस रस्ता भूस्खलनाच्या धोक्यामुळे तात्पुरता बंद करण्यासंबंधी स्पष्टता पाहिजे’

मडगाव : रावणफोंड सर्कल ते पॉवर हाऊस रस्ता भूस्खलनाच्या संभाव्य धोका असल्यामुळे तात्पुरता बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाचे पोलीस अधीक्षक यांनी घेतला आहे, ही बाब अतिशय गंभीर आणि चिंतेची आहे.  आम्ही या निर्णयाविरोधात नाही. सार्वजनिक सुरक्षिततेसाठी कोणतीही पावले उचलणे आवश्यकच आहे, मात्र ही कृती पारदर्शकतेने, विभागीय समन्वयाने आणि लोकांसमोर उत्तरदायित्व ठेवून व्हायला हवी होती, असे मडगावचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे.


या निर्णयामध्ये दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचा सल्ला घेण्यात आला का? असा प्रश्न मी अधिकाऱ्यांना विचारतो. कारण भूस्खलनाचा धोका हा आपत्ती व्यवस्थापनाचा विषय आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि स्थानिक आपत्कालीन सेवा यांचा यात सहभाग असणे आवश्यक आहे, असे प्रभव नायक म्हणाले.


सदर रस्त्याची तांत्रिक किंवा भूवैज्ञानिक पाहणी झाली आहे का? झाली असल्यास, ती माहिती सार्वजनिक करणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून अफवा पसरणार नाहीत आणि लोकांचा प्रशासनावर विश्वास राहील, असे मत प्रभव नायक यांनी व्यक्त केले.


रस्ता पुन्हा वाहतुकीस खूला करण्यासाठी सरकारची काय योजना आहे? नागरिकांना तात्पुरत्या उपाययोजना आणि दीर्घकालीन प्रतिबंधात्मक उपाय यांची माहिती देणे सरकारची जबाबदारी आहे. एकंदर स्थिती पुर्वपदावर आणण्यासाठी एक स्पष्ट वेळापत्रक जाहीर करणे आवश्यक आहे, असे प्रभव नायक म्हणाले.


आपत्ती व्यवस्थापन विभागाने जबाबदाऱ्या नेमून दिल्या आहेत का? अशा आपत्कालीन परिस्थितीत सार्वजनीक बांधकाम खाते, वाहतूक पोलीस, अग्निशमन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात योग्य समन्वय असणे गरजेचे आहे. एकंदर समन्वय कुणाकडे आहे हे मडगावकरांना जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे, असे प्रभव नायक यांनी म्हटले आहे.


हा रस्ता दैनंदिन वाहतूक, आपत्कालीन सेवा आणि नागरिकांच्या उपजीविकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांना फक्त सूचना नव्हे, तर स्पष्ट माहितीही मिळाली पाहिजे. मी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे  मागणी करतो की त्यांनी सद्यस्थितीवर त्वरित एक अधिकृत अहवाल जाहीर करावा, तज्ज्ञ व संबंधित विभागांसोबत संयुक्त पाहणी आयोजित करावी आणि आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांची स्पष्ट माहिती लोकांसमोर ठेवावी, अशी मागणी प्रभव नायक यांनी केली आहे.


आमती ही मागणी राजकीय नसून, ती नागरिकांच्या सुरक्षिततेची, पारदर्शकतेची आणि जवाबदारीची आहे. मी मडगावकरांना खात्री देतो की, त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि त्यांची सुरक्षितता व सन्मान कायम राहावा यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे, असे प्रभव नायक यांनी म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!