google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
Homeअर्थमत/ टेक्नॉलॉजीदेश/जग

Big news : Mahadev APP चा सह संस्थापक रवि उप्पल UAE मध्ये ताब्यात

Mahadev App : महादेव बेटिंग ॲपच्या मालकाला अटक झाली आहे. महादेव बेटिंग ॲपचा मालक रवी उप्पल याला दुबईतून अटक करण्यात आली आहे. रवी उप्पल विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर ही अटकेची कारवाई झाली आहे. रवी उप्पलसोबतच इतर दोन जणांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सौरव चंद्राकर आणि रवी उप्पल या सगळ्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. ईडीकडून या दोघांचा शोध सुरु होता. या दोघांच्या विरोधात ईडीने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. याच नोटीसच्या आधारे दुबईच्या स्थानिक पोलिसांनी रवी उप्पला अटक केली आहे.

काय आहे नेमके Mahadev App?

महादेव ॲप (Mahadev App) सट्टेबाजीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. इथं लोक ऑनलाईन सट्टेबाजी केली जात होती. या ॲपला भारतात बंदी घालण्यात आली आहे. पण इतर देशांमध्ये हे ॲप अद्यापही सुरु आहे. छत्तीसगडमधील चंद्राकर आणि त्याचा सहकारी रवी उप्पल याला दुबईत बसून चालवत होते. या दोघांच्या विरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं.

सौरव चंद्राकर हा आधी रायपूरमध्ये एक ज्यूस सेंटर चालवत होता. त्यानंतर तो सट्टेबाजीमध्ये सहभागी झाला. सौरव आणि रवी यांच्याकडे सहा हजारांहून अधिक संपत्ती असण्याचा संशय आहे. हवालाच्या माध्यमातून रोकड दुबईला पाठवण्यात आली. तपास यंत्रणांना संशय आहे की दाऊद इब्राहिम टोळीने दुबईतून महादेव बुक अॅप (Mahadev App) इतक्या मोठ्या प्रमाणावर चालवण्यासाठी मदत केली.

Mahadev App?

महादेव बेटिंग ॲप (Mahadev App) प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महादेव ॲप प्रकरणात ईडी चौकशी करत आहे. 2 नोव्हेंबरला ईडीला महत्वाची माहिती मिळाली होती. 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर 2023 ला छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुक झाल्या. यावेळी महादेव अॅपच्या प्रमोटरांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम छत्तीसगडमध्ये नेण्यात येत आहे, अशी माहिती ईडीला मिळाली. मग ईडीने हॉटेल ट्रायटन आणि अन्य ठिकाणी झडती घेतली. यावेळी 5 कोटी रूपये ईडीने जप्त केले.

ईडीने असीम दास याला अटक केली. असीम दासने मान्य केलं की, ही रक्कम छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीतील खर्चासाठी नेली जात होती. ‘बघेल’ नेत्याला देण्यासाठी ही रक्कम नेली जात होती. ईडीने महादेव ॲपच्या बेनामी अकाऊंटची चौकशी केली. यात 15. 59 कोटींची रूपये फ्रिज केले गेले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!