
आयडीबीआय बँकेने कमावला ९ महिन्यात तब्बल ‘इतका’ नफा…
आज आयडीबीआय बँकेने त्यांच्या आर्थिक वर्ष २४ च्या तिसर्या तिमाहीच्या वित्तीय निष्कर्शांची घोषणा केली. आर्थिक वर्ष २४ च्या तिसर्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा वर्षागणिक ५७ टक्क्यांनी वाढून तो रु १,४५८ कोटींवर गेला आहे.
कार्यातून होणारा नफा हा रु २,३२७ कोटींवर गेला. एनआयएम ची नोंद ४.७२ टक्के आणि व्याजातून मिळणारे निव्वळ उत्पन्न हे वर्षागणिक १७ टक्क्यांनी वाढून ते रु ३,४३५ कोटींवर गेला. आर्थिक वर्ष २४ च्या तिसर्या तामाहीत ठेवींवरील खर्च हा ८३ बीपीएस ने वाढून तो ४.३४ टक्के झाला जो २०२३ च्या तिसर्या तिमाहीत ३.५१ टक्के होता. सीआरएकआर २०.३२ टक्के होता म्हणजेच वर्षागणिक १८ बीपीएसची वाढ नोंदवण्यात आली आहे.
रिटर्न ऑन ॲसेट्स (आरओए) ची नोंदणी १.७० टक्के (वर्षागणिक ४८बीपीएसची वाढ) आणि रिटर्न ऑन इक्विटी (आरओई) १९.५७ टक्के (वर्षागणिक ३६१ बीपीएसची वाढ). निव्वळ एनपीएज ०.३४ टक्के होऊन ७४ बीपीएसची सुधारणा झाली आहे. ग्रॉस एनपीएज ४.६९ टक्के होऊन ९१३ बीपीएसची सुधारणा झाली आहे. पीसीआर ९९.१७ टक्के होऊन ११९ बीपीएस ची सुधारणा झाली आहे.