google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘बॅक टू कॅम्पस सेल’मध्ये मिळणार ‘इ प्रॉडक्ट’वर भरमसाठ सवलत…

नवे शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याच्या निमित्ताने क्रोमाने आपला सर्वात लोकप्रिय बॅक टू कॅम्पस सेल सुरु केला आहे. लॅपटॉप्स, टॅबलेट्स, स्मार्टफोन्स, स्मार्ट वॉचेस, हेडफोन्स आणि इयरफोन्सवर भरघोस ऑफर्स मिळवून देणारा क्रोमाचा बॅक टू कॅम्पस सेल विद्यार्थी व तंत्रज्ञानप्रेमींसाठी खरेदीचा अतुलनीय आनंद घेऊन येतो. त्यांच्या वेगवेगळ्या गरजा या एका सेलमध्ये पूर्ण होतात. विशेष व्हाउचर्स आणि सेल ऑफर्सचा लाभ घेऊन आपल्या इच्छाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हा.


क्रोमाच्या बॅक टू कॅम्पस सेलमधील डील्सचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे लॅपटॉप्सवरील डील्स, यामध्ये दर महिन्याला फक्त १४१२ रुपयांपासून सुरु होणारे तब्बल ३५० पेक्षा जास्त पर्याय उपलब्ध आहेत. परवडण्याजोगी किंमत हवी असेल किंवा सर्वोत्कृष्ट कामगिरी क्रोमामध्ये तुमच्या इच्छा आणि आवडीनिवडी नक्की पूर्ण होतील. इंटेल कोर आय३ लॅपटॉप्सच्या किमती फक्त ३२९९० रुपयांपासून पुढे आहेत, त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट होम अँड स्टुडंट्स आधीपासून निःशुल्क इन्स्टॉल करून देण्यात आले आहे.

गेमिंगप्रेमी असाल तर तुमच्यासाठी रायझेन ३ लॅपटॉप्स फक्त ३७९९० रुपयांपासून पुढील किमतींना उपलब्ध आहेत. त्यामध्ये देखील मायक्रोसॉफ्ट होम अँड स्टुडंट्स आधीपासून इन्स्टॉल करण्यात आले आहे. क्रोमामध्ये सर्व ऍपल उत्पादनांवर आकर्षक डील्स देण्यात येत आहेत. आपल्या आवडीच्या ऍपल उत्पादनांच्या विशाल श्रेणीवर विशेष सूट मिळवण्याची उत्तम संधी क्रोमाने आपल्या ग्राहकांना उपलब्ध करवून दिली आहे.


क्रोमाच्या आकर्षक ऑफर्समध्ये टॅबलेट्स आणि स्मार्टफोन्सचा देखील समावेश करण्यात आला आहे. कुठूनही, कधीही डिजिटल शिक्षण मिळवण्यासाठी, आपल्या क्षमतांचा विकास घडवून आणण्यासाठी टॅबलेट खरेदी करा फक्त ११,९९९ रुपयांना. दर महिन्याला फक्त १,३३७ रुपयांपासून पुढील किमतींना तुमचा स्मार्टफोन अपग्रेड करा. तुमचे स्मार्टफोन अपग्रेड अजून जास्त आकर्षक बनवण्यासाठी काही निवडक स्मार्टफोन्सवर ८,००० रुपयांचा एक्स्चेंज बोनस देखील क्रोमामध्ये दिला जात आहे.


याशिवाय काही निवडक स्मार्टफोन्सवर तुम्हाला मिळू शकेल ९,९९९ रुपयांचे एक कॉलिंग स्मार्टवॉच फक्त ४९९ रुपयांना.


संगीत व गाण्यांचे शौकीन असाल तर क्रोमाने तुमच्यासाठी सादर केली आहे इयरफोन्स व हेडफोन्सची विशाल श्रेणी तब्बल ६५% पर्यंत आकर्षक डिस्काउंटसह. खिशावर जरा देखील ताण येऊ न देता, उच्च दर्जाच्या आवाजाचा अनुभव मिळवा, संगीताच्या अनोख्या दुनियेत स्वतःला झोकून द्या. अभ्यास करत असाल किंवा आराम, क्रोमा बनेल तुमचा परफेक्ट ऑडिओ कम्पॅनियन. स्मार्टवॉचेसवर ८०% पर्यंत सूट मिळवा आणि वेयरेबल तंत्रज्ञानाच्या भविष्यासाठी स्वतःला सज्ज करा. कनेक्टेड रहा, फिटनेसवर लक्ष ठेवा आणि स्वतःच्या दिनक्रमाचे व्यवस्थापन अगदी सहजपणे करा.


इतकेच नव्हे तर, क्रोमाने विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करवून देण्याच्या आपल्या बांधिलकीचे पालन करत त्यांचे नवे शैक्षणिक वर्ष अधिक चांगल्या प्रकारे सुरु व्हावे यासाठी नामांकित ब्रँड्ससोबत भागीदारी केली आहे. क्रोमाच्या सोशल मीडिया पेजेसवरील वेगवेगळ्या रोचक ऍक्टिविटीजमध्ये सहभागी व्हा आणि एडटेक प्लॅटफॉर्म टेस्टबुकचे ५०,००० रुपये किमतीचे १२ फुल-टाइम कोर्सेस जिंकण्याची संधी मिळवा. याशिवाय स्पेसिफाईड कॅटेगरीजमधून करण्यात आलेल्या प्रत्येक खरेदीसोबत मिळवा टेस्टबुकच्या स्किल अकॅडेमीचे २५ मिनी-कोर्सेस, ज्यामुळे तुम्हाला उपयुक्त कौशल्ये आत्मसात करण्यात मदत मिळेल.


क्रोमाने द मॅन कंपनीसोबत हातमिळवणी केलेली असल्याने ग्राहकांना लक्झरीचा आगळावेगळा अनुभव घेता येणार आहे. मोबाईल ऍपमार्फत केलेल्या प्रत्येक खरेदीसोबत १२९९ रुपयांचा परफ्युम भेट म्हणून मिळू शकेल. सौंदर्याविषयी विशेष चोखंदळ असलेल्या ग्राहकांना क्रोमामध्ये मिळत आहे एक विशेष संधी मायग्लॅमचे एक कॉम्बो प्रॉडक्ट (लिपस्टिक) फक्त १ रुपयाला मिळवण्याची.


लोकप्रिय बॅक टू कॅम्पस कॅम्पेनचा एक भाग म्हणून क्रोमाने डिजिटल फिल्म्सची एक सीरिज सादर केली आहे. जेन झेड विद्यार्थ्यांची विशेष आवडनिवड, गरजा आणि इलेक्ट्रॉनिक्सचे त्यांच्या जीवनात असलेले अविभाज्य स्थान हा या फिल्म्सचा प्रमुख विषय आहे. लॅपटॉप्स, टॅबलेट्स, स्मार्टफोन्स, स्मार्टवॉचेस, हेडफोन्स आणि इयरफोन्स अशी विविध उत्पादने या फिल्म्समध्ये समाविष्ट करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पर्यायांची विशाल श्रेणी सादर करण्याची क्रोमाची बांधिलकी यामधून दर्शवण्यात आली आहे.


तुमच्या जवळच्या क्रोमा स्टोरला किंवा www.croma.comला भेट द्या, ऑफर्सची संपूर्ण श्रेणी पहा आणि क्रोमाच्या बॅक टू कॅम्पस सेलमध्ये मनोसोक्त खरेदी करा.


डिजिटल फिल्मसाठी लिंक: https://www.youtube.com/watch?v=hHSuZPkkCFY,

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!