google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘हि’ कंपनी तयार करतेय देशातील सर्वात मोठया होम लोन ओरिजिनेशन प्‍लॅटफॉर्म

मुंबई :

हाऊसिंगडॉटकॉम (housing.com) या भारतातील अग्रगण्‍य डिजिटल रिअल इस्‍टेट प्‍लॅटफॉर्मने गृहकर्ज प्रवासाचे डिजिटायझेशन करण्‍यावर लक्ष केंद्रित करणारी फिनटेक स्‍टार्ट-अप इझीलोन मध्‍ये धोरणात्‍मक गुंतवणूक करण्‍याचे ठरवले आहे. विशिष्‍ट गुंतवणूक रक्‍कमेबाबत अद्याप खुलासा करण्‍यात आला नसला तरी या सहयोगाचा भारतातील सर्वात मोठा डिजिटल गृहकर्ज उत्‍पत्ती प्‍लॅटफॉर्म निर्माण करण्‍याकरिता हाऊसिंगडॉटकॉमच्‍या योजनांसाठी पाया रचण्‍याचा मनसुबा आहे.


हाऊसिंगडॉटकॉम या भारतातील अग्रगण्‍य डिजिटल रिअल इस्‍टेट प्‍लॅटफॉर्मने गृहकर्ज प्रवासाचे डिजिटायझेशन करण्‍यावर लक्ष केंद्रित करणारी फिनटेक स्‍टार्ट-अप इझीलोन मध्‍ये धोरणात्‍मक गुंतवणूक करण्‍याचे ठरवले आहे. विशिष्‍ट गुंतवणूक रक्‍कमेबाबत अद्याप खुलासा करण्‍यात आला नसला तरी या सहयोगाचा भारतातील सर्वात मोठा डिजिटल गृहकर्ज उत्‍पत्ती प्‍लॅटफॉर्म निर्माण करण्‍याकरिता हाऊसिंगडॉटकॉमच्‍या योजनांसाठी पाया रचण्‍याचा मनसुबा आहे.

हाऊसिंगडॉटकॉम, प्रोपटायगरडॉटकॉम व मकानडॉटकॉमचे ग्रुप सीईओ ध्रुव अग्रवाल म्‍हणाले, “हाऊसिंगडॉटकॉम ग्राहकांना रिअल इस्‍टेट सेवांची व्‍यापक श्रेणी प्रदान करण्‍याप्रती कटिबद्ध आहे आणि इझीलोनसोबतचा हा सहयोग त्‍या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तारण डिजिटल रिअल इस्‍टेट क्षेत्रात ऑर्गनिक विस्‍तारीकरण आहेत, ज्‍याला आमच्‍या व्‍यासपीठावर असलेल्‍या व्‍यापक प्रमाणातील ग्राहकवर्गाचे पाठबळ आहे.”


अग्रवाल पुढे म्‍हणाले, “तंत्रज्ञान सुधारणा आणि भारत सरकारची कर्ज विभागात डिजिटायझेशनप्रती कटिबद्धता आगामी वर्षांमध्‍ये गृहकर्ज क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणतील. आम्‍ही या क्रांतीमध्‍ये अग्रस्‍थानी असण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”


हा सहयोग हाऊसिंगडॉटकॉमच्‍या बाजारपेठ-अग्रणी डिजिटल उपस्थितीचा फायदा घेण्‍यासाठी, तसेच ब्रोकर्स व विकासकांच्‍या त्‍यांच्‍या प्रख्‍यात नेटवर्कपर्यंत तारण उत्‍पादनांची पोहोच वाढवण्‍यासाठी करण्‍यात आला आहे. कंपनीने निवेदनामध्‍ये म्‍हटले की, “हा सहयोग आमच्‍या विक्रेता ग्राहकांसाठी मूल्‍याची भर करण्‍यासोबत आमच्‍या व्‍यासपीठावर वापरकर्त्‍यांचा सहभाग देखील वाढवतो, तसेच महसूल निर्मितीमध्‍ये वाढ करण्‍यासाठी मार्गदर्शन करतो.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!