google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘या’ ऍपद्वारे करता येईल एलआयसी आयपीओत गुंतवणूक 

मुंबई :
डिजिटल पेमेण्ट्स व आर्थिक सेवा कंपनी ब्रॅण्ड पेटीएमचे मालकीहक्क असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने आज घोषणा केली की, त्यांची पूर्णत: मालकीची उपकंपनी पेटीएम मनी लिमिटेड अंतर्गत महाराष्ट्रातील एचएनआय (गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार) ना युपीआयद्वारे ५ लाखांपर्यतची गुंतवणूक त्यांच्या इच्छित आयपीओमध्ये विनासायास करता येणार असल्याचे घोषित केले.

ईंट्राडे साठी १०/- प्रतिदिन तर एफअँडओ ऑर्डर्ससाठी १०/- प्रतिदिन अशा सर्वात कमी दरांत चालणाऱ्या या पोर्टलचा आवाका स्वाभाविकपणे वाढत आहे. किरकोळ गुंतवणूकदारांच्या अर्थव्यवस्थापनास प्रोत्साहन देण्यासाठी पेटीएम आजीवन मोफत डिमॅट अकाऊंटदेखील पुरवत आहे. प्री ओपन आयपीओ अर्ज देणारे तसेच एलआयसीचे आयपीओ उपलब्ध करवून देणारे पेटीएम हे पहिले व्यासपिठ ठरले आहे.

पेटीएम मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण श्रीधर म्हणाले, “गुंतवणूकदारांना आमच्या सुपर अॅपमुळे झटपट अर्थव्यवस्थापन करता येते. एचएनआयच्या गुंतवणूकीमुळे महाराष्ट्रातील किरकोळ गुंतवणूकदारांना अधिकाधिक किमतीची गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल. बहुप्रतिक्षित आलआयसीचे आयपीओ येण्याच्या दरम्यानच आमचे हे व्यासपिठही बाजारात येत असल्याने गुंतवणूकदारांना याचा निश्चित फायदा होईल.”

“अत्यंत कमी कालावधीत आमच्या पोर्टलने घेतलेली ही भरारी कौतुकास्पद आहे. एलआयसीच्या आगामी आयपीओ व एकूणच अर्थव्यवस्थापनासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय आहे.” असेही ते पुढे म्हणाले.

आजमितीला तब्बल ८.५ लाख ट्रेडींग अकाऊंट्स व ९० लाख म्युचुअल फंड गुंतवणूकदार असलेल्या या पोर्टलची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. यापैकी जवळजवळ ७५% वापरकर्ते वयवर्ष ३५ पेक्षा कमी वयाचे आहेत. दररोजची उलाढाल ७०,००० कोटी असलेल्या या पोर्टलची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता ११,००० कोटी इतकी आहे. गेल्या वर्षभरातच या पोर्टलद्वारे तब्बल म्युचुअल फंड्समध्ये १ कोटी ६२ लाख तर इक्विटी ऑर्डर्समध्ये ३ कोटी १० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे दिसते. १ लाखांहून जास्त युजर्स असलेले हे पोर्टल एनपीएसच्या डिजीटल वितरकांतील भारतातील पहिल्या तीन पोर्टल्सपैकी एक आहे. १.३ लाख युजर्स असलेल्या पेटीएम वेल्थ कम्युनिटीने आतापर्यंत ३९० लाइव्ह इवेंट्स व ३००० तासांचा दृश्य काँटेंट बनवला आहे. मागील वर्षात किरकोळ गुंतवणूकांसाठी झोमॅटो, ग्लेनमार्क, लाईफ सायन्सेस व पेटीम तर मोठ्या गुंतवणूकीसाठी टाटा मोटर्स, टाटा पॉवर व आयटीसी हे सर्वाधिक लोकप्रिय आयपीओ ठरले.

पेटीएम मनी द्वारे एलआयसी आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याचे टप्पे खालीलप्रमाणे:

  • पेटीएम मनीच्या होम स्क्रिनवरील आयपीओ विभागात जा.
  • आपल्या प्राधान्यानुसार इन्वेस्टर टाईप निवडा. ५ लाखांपर्यत गुंतवणूक करु इच्छिणाऱ्यांनी एचएनआय हा पर्याय निवडावा. प्रस्तुत आयपीओमधील या विभागासाठी राखीव असलेल्या जागांनुसार आपली निवड अंकित केली जाईल.
  • जर आपण विमाधारक असाल तर इन्वेस्टर टाईप मधील पॉलिसी होल्डर हा पर्याय निवडा. तुमच्या विम्यास व पेटीएमवरील डिमॅट अकाऊंटशी संलग्न असलेला पॅन क्रमांक एकच असल्याची खात्री करा. तरच आपल्याला पॉलिसी होल्डर हा पर्याय निवडता येईल.
  • ‘करंट ॲन्ड अपकमिंग’ या शिर्षकाखाली आपल्याला एलआयसी आयपीओचा पर्याय दिसेल.
  • हा पर्याय निवडताच आपल्याला ‘अप्लाय नाऊ’  हे बटन दिसेल व ते दाबताच आपण प्रत्यक्ष बिडींग पेजवर जाल. या पेजवर इच्छित किंमत व संख्या टाकावी.
  • आता ‘अॅड युपीआय डिटेल्स’ अंतर्गत आपला युपीआय आयडी टाकावा व ‘अप्लाय’ ह्या बटनावर क्लिक करावे.
  • एकदा आयपीओ चे वितरण झाले की आपणांस त्याचे अपडेट अॅपवर मिळेल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!