google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

ओप्‍पो एफ२३ ५जी सह #FlauntYourSuperpower

मुंबई:

ओप्‍पो या आघाडीच्‍या जागतिक स्‍मार्ट डिवाईसेस ब्रॅण्‍डने त्‍यांचा नवीन स्‍मार्टफोन ओप्‍पो एफ२३ ५जी च्‍या लाँचची घोषणा केली आहे. डिवाईस १८ मे २०२३ रात्री १२ वाजल्‍यापासून ओप्‍पो स्‍टोअरच्‍या (OPPO Store) माध्‍यमातून, अॅमेझॉनवर (Amazon) आणि प्रमुख रिटेल आऊटलेट्समध्‍ये २४,९९९ रूपयांमध्‍ये उपलब्‍ध असेल.

नुकतेच ओप्‍पो व काऊंटरपॉइण्‍टने केलेल्‍या संशोधनामधून निदर्शनास आले की, भारतातील ४ पैकी ३ व्‍यक्‍तींना नोमोफोबिया आहे, म्‍हणजे फोनशिवाय राहण्‍याची, विशेषत: बॅटरी लो/डेड होण्‍याची भिती. या संशोधनामधून निदर्शनास आले की, ४६ टक्‍के प्रतिसादक दररोज दोन वेळा त्‍यांच्‍या स्‍मार्टफोन्‍सना चार्ज करतात, ९२ टक्‍के प्रतिसादक बॅटरी संपण्‍याच्‍या समस्‍यांचा सामना करण्‍यासाठी पॉवर-सेव्हिंग मोडचा वापर करतात आणि ६० टक्‍के स्‍मार्टफोन वापरकर्ते त्‍यांच्‍या सध्‍याच्‍या स्‍मार्टफोनमध्‍ये चांगली बॅटरी नसल्‍यास नवीन स्‍मार्टफोन खरेदी करतील.

नोमोफोबियाच्‍या समस्‍येचे निराकरण करण्‍यासाठी आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारा, मोठी क्षमता व टिकाऊ बॅटरी असलेल्‍या डिवाईसप्रती या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी ओप्‍पोने एफ२३ ५जी लाँच केला आहे.

या हँडसेटमध्‍ये ओप्‍पोचे प्रोप्रायटरी ६७ वॅट सुपरवूकTM फ्लॅश चार्जिंग आहे, जे डिवाईसला फक्‍त १८ मिनिटांमध्‍ये ५० टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज करते, तर ५ मिनिटांचे चार्ज जवळपास ६ तासांपर्यंत फोन कॉल्‍स किंवा २.५ तासांपर्यंत यूट्यूब व्हिडिओ पाहण्‍याची सुविधा देऊ शकते. संपूर्ण चार्ज असल्‍यास या स्‍मार्टफोनमधील ५००० एमएएच बॅटरी जवळपास ३९ तासांपर्यंत फोन कॉल्‍स आणि १६ तासांपर्यंत यूट्यूब व्हिडिओ पाहण्‍याची सुविधा देते.

तसेच ओप्‍पोचे बॅटरी हेल्‍थ इंजिन खात्री देते की डिवाईस १६०० वेळा चार्ज-डिस्‍चार्ज करता येऊ शकतो, म्‍हणजेच एफ२३ ५जी जवळपास चार वर्षांसाठी सानुकूल क्षमतेपर्यंत कार्य करू शकतो.

ओप्‍पोचे चीफ मार्केटिंग ऑफिसर दमयंत खनोरिया म्‍हणाले, ‘‘ओप्‍पोमध्‍ये आम्‍हाला माहित आहे की, नोमोफो‍बिया किंवा मोबाइल फोनशिवाय असण्‍याची किंवा मोबाइल फोनचा वापर करू न शकण्‍याची भिती अनेक स्‍मार्टफोन वापरकर्त्‍यांसाठी खरी समस्‍या आहे. ओप्‍पो एफ२३ ५जी सह आम्‍हाला नवोन्‍मेष्‍कारी तंत्रज्ञान प्रदान करण्‍याचा अभिमान वाटतो, जसे बॅटरी हेल्‍थ इंजिन व सुपरवूक फास्‍ट चार्जिंग, जे एकसंधी अनुभवासाठी विश्‍वसनीय व सोईस्‍कर बॅटरी कार्यक्षमता देतात. ज्‍यामुळे तुम्‍ही तुमच्‍या स्‍मार्टफोनमधील बॅटरी संपण्‍याची चिंता न करता तुम्‍हाला आवडणा-या मनोरंजनाचा आनंद घेण्‍यावर लक्ष केंद्रित करू शकता.’’

तसेच, ओप्‍पो ऑल-डे एआय पॉवर-सेव्हिंग मोड, सुपर नाइट-टाइम स्‍टॅण्‍डबाय आणि अॅडप्‍टर ओव्‍हरलोड प्रोटेक्‍शन, फ्लॅश चार्ज कंडिशन आयण्डिटिफिकेशन प्रोटेक्‍शन, चार्जिंग पोर्ट ओव्‍हरलोड प्रोटेक्‍शन, बॅटरी करंट/व्‍होल्‍टेज ओव्‍हरलोड प्रोटेक्‍शन व बॅटरी फ्यूज प्रोटेक्‍शन यांचा समावेश असलेल्‍या ५-लेयर चार्जिंग प्रोटेक्‍शन अशा वैशिष्‍ट्यांसह बॅटरी विश्‍वसनीयता व सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!