HCG कॅन्सर हॉस्पिटलची आँकोलॉजी आता गोव्यातही…
HCG या भारतातील एका भल्या मोठ्या कॅन्सर केअर नेटवर्कने गोव्यात आपले OPD कन्सल्टेशन सुरू करून या प्रांतात आपल्या तज्ज्ञ आँकोलॉजी सेवा विस्तारित केल्या आहेत. HCG कॅन्सर हॉस्पिटल, बंगळूर येथील आँकोलॉजिस्ट्सची एक समर्पित टीम, खालील दोन स्थळी महिन्यातून दोन वेळा कन्सल्टेशन आयोजित करतील. पंजीम येथील कॅम्पल क्लिनिक आणि मडगाव येथील रॉयल हॉस्पिटल. या उपक्रमाचा उद्देश गोव्यातील रुग्णांना खास उपचारांपर्यंत आणि तज्ज्ञ कर्करोग विशेषज्ञापर्यंत पोहोच मिळवून देऊन जागतिक दर्जाची कॅन्सर केअर प्रदान करण्याचा आहे.
ही OPD सत्रे आयोजित करून कर्करोगाचे लवकर निदान, कर्करोगाविषयीची जागरूकता, वैद्यकीय पोहोच आणि गोव्यात सध्या असलेले विविध उपचार पर्याय या गोष्टींमध्ये वाढ करण्याचा HCG चा उद्देश आहे. सुलभ निदान आणि उपचार यांना प्राधान्य देऊन या भागात कॅन्सर केअर वाढविण्याची आपली वचनबद्धत HCG ने दाखवून दिली आहे आणि त्यासाठी त्यांनी नावीन्यपूर्ण आणि रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन अंगिकारला आहे.
व्यापक कॅन्सर उपचार प्रदान करण्याबद्दल ओळखले जाणारे HCG कॅन्सर हॉस्पिटल बंगळूर आधुनिक इम्यूनोथेरपी, रोबोटिक सर्जरी, लिव्हर आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट, सायबरनाईफ प्रक्रिया आणि व्यक्तिविशिष्ट जेनोमिक्स सेवा प्रदान करते.
मनीष कुमार, रिजनल चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कर्नाटक, हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्राइजेस लिमिटेड म्हणाले, “OPD कन्सल्टेशन गोव्यात लॉन्च करून आम्ही HCG ची तज्ज्ञ आँकोलॉजी सेवा या प्रांतात विस्तारित करण्यास वचनबद्ध आहोत. HCG कॅन्सर हॉस्पिटल, बंगळूर येथील आँकोलॉजिस्ट्सच्या समर्पित टीम द्वारे आम्ही गोव्यातील रुग्णांना जागतिक दर्जाची कॅन्सर केअर प्रदान करू इच्छितो आणि ही सेवा मिळवण्यासाठी त्यांना गोव्याच्या बाहेर येण्याची गैरसोय न व्हावी म्हणून गोव्यातच विशेष उपचार आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल याची खातरजमा करू इच्छितो.”
HCG कॅन्सर हॉस्पिटल बंगळूर त्याच्या उपचारांच्या प्रगत प्रणाली, अत्याधुनिक निदानात्मक, उपचारात्मक उपकरणे आणि रुग्णांमध्ये असामान्य परिणाम या बद्दल ओळखले जाते आणि स्थापनेपासून लक्षावधी लोकांना या हॉस्पिटलने लक्षणीय देखभाल प्रदान केली आहे. न्यूक्लिअर मेडिसीन, PET-CT, जेनोमिक्स आणि लो-डोस इम्यूनोथेरपी सहित कॅन्सरच्या निदनाच्या आणि उपचारांच्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीसह हे हॉस्पिटल रुग्ण-केंद्रित दृष्टिकोनास प्राधान्य देते.