‘हिमालया’ने आणले परिपूर्ण बेबी मसाज ऑईल
हिमालया वेलनेस कंपनी या भारतातील अग्रगण्य वेलनेस ब्रॅण्डने नुकतेच कोकोनटच्या चांगुलपणाने युक्त हिमालया बेबी मसाज ऑईलच्या लाँचची घोषणा केली.
हे ऑईल विशेषत: काळजीपूर्वक निवडलेल्या औषधी वनस्पती आणि घटकांसह तयार केले जाते, जे नॉन-स्टीकी फॉर्म्युलासह बाळाच्या त्वचेचे पोषण करण्यास मदत करते. शिवाय, ते बाळाच्या त्वचेवरील ओलावा दूर करून त्वचा कोमल व मृदू बनवते. कोरफड व्हेरा, व्हेटिव्हर, विंटर चेरी आणि कंट्री मॅलो या चार औषधी वनस्पतींच्या संयोजित मिश्रणामुळे रक्ताभिसरण सुधारते, स्नायू मजबूत होतात आणि बाळाच्या वाढीस चालना मिळते, असा दावा केला आहे.
हिमालयाचे नवीन बेबी मसाज ऑईल हे पारंपारिक ज्ञान व आधुनिक विज्ञान यांचे उत्तमरित्या परिभाषित संयोजन आहे आणि त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. हे पॅराबेन्स, खनिज तेल आणि सिंथेटिक सुगंधांशिवाय तयार केले जाते, ज्यामुळे ते नवजात बालकांसाठी सुरक्षित स्किनकेअर उत्पादन आहे.