google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘हा’ आहे जगातील सर्वात मोठा टीव्ही…

मुंबई:

व्‍हीयू टेलीव्हिजन्स या भारतातील विशाल आकारमानाच्या टीव्हींचे उत्पादन करणाऱ्या सर्वाधिक वेगाने वाढत असलेल्या कंपनीने व्हीयू ९८ (VU 98) मास्टरपीस टीव्ही बाजारात आणला आहे. ग्राहकांना आता त्यांचा आवडता ओटीटी कंटेण्ट, क्रीडास्पर्धा, मालिका आणि बातम्या बघताना आता घरबसल्या चित्रपटगृहाचा अनुभव घेणे शक्य होणार आहे. या टीव्हीची किंमत ६,००,००० रुपये आहे आणि तो केवळ अमेझॉनवरून खरेदी केला जाऊ शकतो.

व्‍हीयूच्या संस्थापक आणि अध्यक्ष देविता सराफ म्हणाल्या, “लग्झरी आणि नवोन्मेषाची खरीखुरी पावती असलेला व्हीयू ९८ मास्टरपीस टीव्ही सर्वांपुढे आणणे आमच्यासाठी उत्‍साहपूर्ण अनुभव आहे. व्‍हीयू मोठ्या आकारमानाच्या टीव्हींच्या क्षेत्रातील नाविन्‍यपूर्ण कंपनी आहे. कंपनीने २०१२ मध्ये ८४ इंची टीव्ही बाजारात आणला होता. त्यानंतर २०१८ मध्ये कंपनीने जगातील एकमेव १०० इंची टीव्ही बाजारात आणला. ओटीटीमुळे जगभरातील कंटेण्ट भारतीय उपभोक्त्यांच्या घरात आला आहे. व्हीयू ९८ मास्टरपीस टीव्हीच्या स्वरूपात व्‍हीयू चित्रपटगृह भारतीय उपभोक्त्यांच्या घरात आणते आहे.”


अमेझॉनच्या वायरलेस अँड होम एंटरटेन्मेंट विभागाचे संचालक रणजित बाबू म्हणाले, “आम्ही आमच्या ग्राहकांना भारतात टीव्हींची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देतो. वेगवेगळ्या आकारमानाचे स्क्रीन आणि सुविधा असलेले टीव्ही आम्ही विक्रीसाठी ठेवतो. अतिविशाल व्‍हीयू मास्टरपीस मालिकेमुळे आमची श्रेणी आणखी भक्कम झाली आहे. अव्वल दर्जाचे टीव्ही आणि पैशाने विकत घेता येईल तेवढा उत्तम बघण्याचा अनुभव यांची मागणी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा टीव्ही आहे.”


खासगी जेटचा अनुभव:

व्हीयू ९८ मास्टरपीस टीव्ही हा खासगी जेट विमानांपासून प्रेरणा घेत ३००० तन्यता असलेल्या एअरोस्पेस दर्जाच्या अॅल्युमिनिअमपासून घडवण्यात आला आहे. या धातूची मजबूती आणि सौंदर्य यांमुळे व्हीयू ९८ मास्टरपीस टीव्हीची रचना अत्यंत आटोपशीर झाली आहे. तो भिंतीवर लावणे किंवा टेबलावर ठेवणे अत्यंत सोपे आहे. त्याचप्रमाणे तो खोलीत पार्टिशन (विभाजन) म्हणूनही वापरला जाऊ शकतो. टीव्हीच्या विशाल स्क्रीनमुळे तसेच १००० निट्स ब्राइटनेसमुळे तो बघण्याचा अनुभव अत्यंत प्रभावी ठरतो. डॉल्बी व्हिजन आणि एचडीआर१०+ कंटेण्टमुळे पडद्यावरील रंग जिवंत आणि दृश्ये खरीखुरी भासतात.


ओटीटी कंटेण्ट बघताना चित्रपटगृहाचा अनुभव:

दृश्य अनुभवाला पूरक म्हणून व्हीयू ९८ मास्टरपीस टीव्हीमध्ये २०४ वॉट्सचा डीजे सबवूफर अंगभूत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना सर्व काही विसरायला लावणारा सुस्पष्ट आणि खोल श्राव्य अनुभवही मिळणार आहे. शिवाय, टीव्ही ब्ल्यूटूथ कनेक्टिविटीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे कस्टमाइझ करण्याजोग्या ऑडिओ सेटअपसाठी तो बाह्य स्पीकर्ससोबतही सहजतेने पेअर केला जाऊ शकतो.


प्लग अँड प्ले होम थिएटर:

स्क्रीन्स १०० टक्के अँटि-ग्लेअर आहेत आणि १२० हर्टझ रिफ्रेश रेट आहे. त्यामुळे स्वच्छ उजेड असलेल्या, सूर्यप्रकाश असलेल्या खोलीतही तो ठेवला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे स्पॉट लायटिंग असलेल्या ठिकाणीही ठेवला जाऊ शकतो. हा सगळा प्रकाश शोषण्याची क्षमता टीव्हीच्या ए+ दर्जाच्या काळ्या स्क्रीनमध्ये आहे. होम थिएटर्ससाठी आवश्यक असलेल्या डार्क रूम्सची (गडद जागा) या टीव्हीसाठी आवश्यकता नाही.


ठेवण्यास आणि वापरण्यास सोपा:

व्हीयू ९८ मास्टरपीस टीव्ही ठेवण्याचे अनेक पर्याय आहेत. तो सहज भिंतीवर लावता येतो, टेबलावर ठेवता येतो किंवा अगदी खोलीचं विभाजन करण्यासाठीही वापरता येतो. टीव्हीचे डिझाइन सौंदर्याच्या दृष्टीने पुढून आणि मागून दोन्ही बाजूंनी देखणे आहे. त्यामुळे कोणत्याही अंतर्गत रचनेला शोभेल अशा आकर्षक सेंटरपीससारखा तो वाटतो. वापरकर्त्याच्या सोयीला टीव्हीच्या रचनेत प्राधान्य देण्यात आले आहे. सर्व वयोगटाच्या व्यक्तींना वापरण्यास सोपा जाईल असा याचा इंटरफेस आहे. टीव्ही बसवण्याची प्रक्रियाही विनाकटकट होते. खोलीची नव्याने रचना करणे, केबल्सची गुंतागूंत किंवा बाहेरील तंत्रज्ञाची मदत या सगळ्याशिवाय हा बसवला जाऊ शकतो.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!