google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

रॉयल एनफिल्‍डने लाँच केले ‘हे’ नवे मॉडेल…

पणजी:

क्रूझर श्रेणीमध्‍ये विशिष्‍टता, शैली व सुलभतेच्‍या नवीन स्‍तराची भर करत रॉयल ए‍नफिल्‍डने नोव्‍हेंबर २०२२ मध्‍ये ईआयसीएमए येथे आकर्षक नवीन सुपर मेटेअर ६५० दाखवली आणि त्‍यानंतर मोटरसायकलला तिच्‍या सर्व रंगांमध्‍ये ब्रॅण्‍डचा वार्षिक मोटरसायकलिंग फेस्टिवल राइडर मॅनियामध्‍ये देखील दाखवले.


आज, रॉयल एनफिल्‍डने भारत व युरोपमध्‍ये नवीन सुपर मेटेअर ६५० लाँच केली, जेथे ब्रॅण्‍डने मोटरसायकलची रिटेल उपलब्‍धता व किंमतीची घोषणा केली. दोन वैशिष्‍ट्यपूर्ण व्‍हेरिएण्‍ट्स –सुपर मेटेअर ६५० व सुपर मेटेअर ६५० टूरर आणि सात आकर्षक रंगांमध्‍ये निर्माण करण्‍यात आलेली नवीन सुपर मेटेअर ६५० ३,४८,९०० रूपये (एक्‍स-शोरूम, इंडिया),६,७९९ जीबीपी (ओटीआर, यूके) आणि ७,८९० युरो (एमएसआरपी, फ्रान्‍स) या किंमतीपासून उपलब्‍ध असेल. आजपासून भारतात डिस्‍प्‍ले व बुकिंग्‍जना सुरूवात होत आहे आणि फेब्रुवारीपासून डिलिव्‍हरींना सुरूवात होईल. आजपासून युरोपमध्‍ये बुकिंग्‍जना सुरूवात होत आहे आणि मार्च २०२३ च्‍या मध्‍यापासून विक्रीला सुरूवात होईल.

सुपर मेटेअर ६५० रॉयल एनफिल्‍डच्‍या उच्‍च दर्जाच्‍या क्रूझर्स निर्माण करण्‍याच्‍या वारसाला पुढे घेऊन जाते. ही मोटरसायकल प्रशंसित ६४८ सीसी ट्विन व्‍यासपीठावर केंद्रित आहे. २०१८ पासून या व्‍यासपीठाला अनेक पुरस्‍कार-प्राप्‍त मोटरसायकल्‍स, इंटरसेप्‍टर आयएनटी ६५० आणि कॉन्टिनेण्‍टल जीटी ६५० अंतर्गत जगभरात मान्‍यता मिळाली आहे. सर्वात विश्वासार्ह व आनंददायक राइड सुनिश्चित करण्यासाठी या प्रक्रियेत दहा लाख किलोमीटरहून अधिक प्रवास करून बेल्जियन पेव्‍ह आणि भारत, यूके व स्पेनमधील महामार्ग, बायवे, नगरे व शहरांमध्‍ये या मोटरसायकलची प्रखर चाचणी घेण्‍यात आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!