google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘झनक’ची ‘हि’ वेधक झलक पहिली का?

आगळावेगळा आशय देण्याकरता आणि आजवर अस्पर्शित राहिलेल्या विषयांना हात घालण्यात ‘स्टार प्लस’ वाहिनीचा हातखंडा आहे. झनक ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील नवी मालिका आहे, ज्यात आशा आणि स्वप्ने बाळगणाऱ्या एका हुशार तरुण मुलीची कथा चित्रित करण्यात आली आहे. तिच्या आयुष्यात अनपेक्षित उद्भवलेली परिस्थिती पाहताना प्रेक्षक निश्चितच या कथेत गुंतत जातील.

मालिकेतील ‘झनक’ ही मुख्य व्यक्तिरेखा हिबा नवाब हिने साकारली असून क्रिशल आहुजा या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहे. अलीकडेच निर्मात्यांनी या मालिकेचा हृदयस्पर्शी ‘प्रोमो’ प्रदर्शित केला आहे. एका वंचित पार्श्वभूमीतून आलेल्या आणि आयुष्यातील संघर्ष करणाऱ्या मुलीचा प्रवास या ‘प्रोमो’मध्ये प्रेक्षकांसमोर उलगडत जातो. झनक तिच्या दैनंदिन आयुष्यात उद्भवणाऱ्या अडचणींचा सामना कशी नेटाने करते, याची झलक या ‘प्रोमो’त बघायला मिळते. मात्र, तिच्या कुटुंबावर अचानक झालेल्या आघाताने तिचे जग पार बदलून जाते.

याच वेळी झनकला मदतीचा हात देणाऱ्या अनिरुद्धचा या मालिकेत प्रवेश होतो. कितीतरी वेळा झनक आणि अनिरुद्ध परस्परांच्या समोर येतात, पण त्यांची भेट होत नाही. मात्र, नशीब पुन्हा या दोघांना एकाच घरात एकत्र आणते. वंचित पार्श्वभूमीतून आलेली असूनही झनक तिच्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी कशी उभी राहते आणि तिचे प्रेम तिचा स्वीकार करते का? या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मालिका पुढे सरकेल, तशी मिळत जातील. झनकची कथा प्रेक्षकांकरता भावनेने ओथंबलेली असंख्य वळणे घेणारी ‘रोलरकोस्टर’ सफर आहे आणि झनक एका फिनिक्स पक्ष्यासारखी राखेतून पुन्हा जन्म कसा घेते, याचे साक्षीदार प्रेक्षकांना होता येईल.

‘स्टार प्लस’ नेहमीच आपल्या प्रेक्षकांकरता रंजक आशय सादर करते. आपण असे म्हणू शकतो की, ही अशी वाहिनी आहे जिथे ‘अनुपमा’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘तेरी मेरी डोरियां’, ‘इमली’ आणि ‘बातें कुछ अनकही सी’ यांसारख्या अत्यंत वेधक, महिला सबलीकरणाच्या पात्रावर केंद्रित असणाऱ्या या मालिका पाहताना प्रेक्षकांच्या मनात भावना उचंबळून येतात.

‘स्टार प्लस’ वाहिन्यांवरील मालिकांमधून महत्त्वाकांक्षी स्त्री पात्रांचे जे चित्रण करण्यात आले, त्याला आजमितीस प्रेक्षकांची मोठी वाहवा मिळाली आहे. देशातील महिलांकरता या मालिकांमधील या खंबीर स्त्री व्यक्तिरेखा ठोस आदर्श ठरतात. ‘झनक’ मालिकेद्वारेही, ‘स्टारप्लस’ने हा वारसा जपत, ‘झनक’ ही अशीच एक सशक्त स्त्री व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर अनोख्या पद्धतीने आणण्याची योजना आखली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!