‘पुष्पा 2: द रुल’चे धमाकेदार पोस्टर पाहिले का?
हैदराबाद:
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात ‘पुष्पा’ची चर्चा आहे. अलीकडेच, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या व्हिडिओने प्रेक्षक उत्साहित झाले असून, ह्या व्हिडिओने ‘पुष्पा’ विषयीची उत्सुकता अधिक ताणली आहे. पुष्पा वरती पुढे आणखी काय पहायला मिळेल? या विचाराने सिनेप्रेमी उत्साही झाले आहेत. 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजून 5 मिनिटांनी एका मोठ्या घोषणेसाठी लोकांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर, निर्मात्यांनी ‘पुष्पा 2: द रुल’च्या धमाकेदार पोस्टरचे अनावरण केले आहे.
या पोस्टरने पुष्पा “फ्लावर नहीं फायर है” हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. पोस्टरमध्ये आयकॉन स्टार अल्लू अर्जुन उर्फ पुष्पराज उठून दिसत आहे. हे अनोखे, पोस्टर खरोखरच सर्वात हटके बनले आहे.
#Pushpa2TheRule Begins!!! pic.twitter.com/FH3ccxGHb8
— Allu Arjun (@alluarjun) April 7, 2023
दरम्यान, वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘पुष्पा 2: द रुल’च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. देशभरात या सिनेमाबाबत होत असलेली चर्चा पाहता, हा चित्रपट देशात इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
अशातच, ‘पुष्पा 2: द रुल’चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून, मिथ्री मूव्ही मेकर्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच, या सिनेमात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल हे प्रमुख भूमिकेत आहेत.