google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जगसिनेनामा 

‘लोकशाहीचा मुखवट्यातील फॅसिझमविरुद्ध लढायचं आहे’

जर आपल्याला एक क्रांति घडवून आणायची आहे तर मग आपण सगळ्यांनी आपले मोबाइल फोन्स आणि टॅबलेट नष्ट करायला हवेत, जसं स्वदेशी चळवळीदरम्यान आपण परदेशी कापडाची होळी केली होती. आज आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढा द्यायचा नाहीये तर लोकशाहीचा मुखवटा धारण केलेल्या फॅसिझमविरुद्ध आपल्याला लढायचं आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अनुराग कश्यप याने केले आहे. कलकत्ता येथील एका कार्यक्रमामध्ये तो
यावेळी अनुराग कश्यपने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि एकूणच त्यामुळे देशातले बदलेले वातावरण याबद्दल भाष्य केलं आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे आयोजित केलेल्या भव्य सोहळ्याला देशातील मोठमोठ्या सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. त्याबद्दलच अनुरागला विचारणा झाल्यावर त्याने यावर भाष्य केलं.

अनुराग म्हणाला, “२२ जानेवारीला जे काही घडलं ती एक मोठी जाहिरात होती. मलातरी किमान ते तसंच वाटलं. बातम्या सुरू असताना ज्या जाहिराती असतात अगदी तशीच ही जाहिरात होती, फक्त ही २४ तास चालणारी जाहिरात होती. मी नास्तिक आहे यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे माझा वाराणसीमध्ये जन्म झाला आहे अन् धर्माच्या नावाने केला जाणारा व्यवसाय हा मी फार जवळून पाहिला आहे. धर्म हा निंदकाचा शेवटचा उपाय आहे. जेव्हा तुमच्याकडे काहीच उरत नाही तेव्हा तुम्ही धर्माकडे वळता.”

पुढे अनुराग म्हणाला, “मी स्वतःला नास्तिक मानतो कारण लहानपणापासून मी बऱ्याच हतबल लोकांना मंदिरात जाऊन देवासमोर हात पसरताना पाहिलं आहे, जसं की देवाकडे एक रामबाण उपाय आहे ज्यामुळे त्यांच्या सर्व समस्या दूर होणार आहेत. हा सगळा प्रकार थांबवण्यासाठी कुणीही मोहीम का काढली नाही?” आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर आपले मोबाइल फोन्स आणि टॅबलेट आपण फेकून द्यायला पाहिजेत असंही अनुराग म्हणाला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!