google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘उदयनराजेंनी नारीशक्तीवर नेहमीच दाखवला विश्वास’

सातारा जिल्हा भाजपा महिला आघाडीच्या वतीने, जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर नारी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन जिल्हापरिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागध्हात केले होते

त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून चित्रा वाघ बोलत होत्या. यावेळी सातारा जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा चित्रलेखा माने-कदम, भाजपा राज्य कार्यकारीणी सदस्या गितांजली कदम व माजी नगराध्यक्षा रंजना रावत, सुवर्णाताई पाटील, समता मनोज घोरपडे, तेजस्वीनी घोरपडे, माजी जिल्हापरिषद सदस्या अर्चनाताई देशमुख, सुनीशा शहा, कविता कचरे, वैशाली भिलारे, आदी मान्यवर पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते.


यावेळी माजी नगराध्यक्षा आणि भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्या रंजना रावत यांनी सांगीतले की, महिला भगिनींच्या कायम पाठीशी असणा-या खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महिलांच्या कार्यक्षमतेवर कधीही अविश्वास दाखवलेला नाही. एखादी महिला हे करु शकणार नाही अशी नकारात्मक मानसिकता महाराजसाहेबांकडे नाही. जातीधर्माच्या आणि स्त्री-पुरुष भेदाच्या पलिकडे विकासाचा दृष्टीकोन असणारे छत्रपती उदयनराजे यांच्या प्रयत्नामधुनच नारी शक्ती वंदना हा महिला भगिनींच्या सन्मानाचा कार्यक्रम होत आहे.


आपल्या ओघवत्या शैलीत आणि अभ्यासपूर्ण भाषणात भाजपा महिला आघाडी प्रदेश संघटक आणि रहिमतपूर पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा माने यांनी जागतिक महिला दिनाचा इतिहास उलगडताना, गगनाला गवसणी घालण्याची क्षमता नारी मध्ये आहे, नारीशक्ती शिवाय जग अपूर्ण आहे, जिजाऊ माँसाहेबांमुळे शिवबा घडले त्यांनीच पुढे इतिहास निर्माण केला त्याच पध्दतीने जिद्दीने आपण समाजासाठी अखंड कार्यरत राहूया, आजचा नारी सन्मान अनेकांना प्रेरणा देणारा ठरणार आहे असे गौरवपूर्ण मत व्यक्त केले.


यावेळी सुवर्णाताई पाटील अर्चनाताई देशमुख यांनी देखिल आपले मनोगत व्यक्त केले.


चित्रा वाघ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते जिल्हयातील भगिनींच्या कार्यकर्तुत्वाचा यथोचित सन्मान करण्यात आला. नारी शक्ती वंदना कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरभिताई भोसले यांनी केले आभार अर्चनाताई देशमुख यांनी मानले तर सुत्रसंचालन संतोष कणसे यांनी केले.


कार्यक्रमास सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आवर्जुन उपस्थित राहीले. त्यांच्या हस्ते चित्रा वाघ यांचे माँसाहेब जिजाऊ आणि बालशिवबा यांची प्रतिमा भेट देण्यात येवून सातारकरांच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच महिला भगिनींच्या मनाप्रमाणे सातारा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार निवडुन येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला.


कार्यक्रमास जिल्हापरिषदेचे माजी सभापती आणि सातारा लोकसभा मतदार संघाचे समन्वयक सुनील काटकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस विठठल बलशेटवार, काका धुमाळ, युवा नेते संग्राम बर्गे, भाजमाचे चिन्मय कुलकर्णी, पंकज चव्हाण, मनीषताई पांडे, माजी नगराध्यक्षा सुजाताराजे महाडीक आणि स्मिताताई घोडके, भाजपा शहराध्यक्ष व माजी नगरसेवक विकास गोसावी, रविंद्र लाहोटी, यांचेसह बहुसंख्य महिला भगिनी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान, भाषणाचे सुरुवात बहुतांशी नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अश्या प्रकारच्या घोषणा देवून दमदार केली. चित्राताई वाघ यांनी हमारा नेता कैसा हो- उदयनमहाराज जैसा हो, देश का नेता कैसा हो- नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषण दिल्या त्यावेळी सभागृह दणाणून गेले.

सातारा जिल्हयात भारतीय जनता पक्षाचे काम करीत असताना, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां महिला भगिनींच्या समन्वयामधुन, शासनाच्या योजना जिल्हयातील प्रत्येक गावात आणि तळागाळापर्यंत पोहचवण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे. आमच्या प्रयत्नांना सातारा जिल्हयाचे नेते आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातत्याने सहकार्य केले आहे. आम्हा महिला भगिनींच्या पाठीशी खासदार छत्रपती उदयनराजे हे नेहमीच मोठया भावासारखे खंबीरपणे उभे राहात आलेले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार म्हणून समोर आणि व्यासपिठावरील बसलेल्या महिला भगिनींच्या मनातील खासदार  छत्रपती उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी मिळावी अशा भावना आहेत. या भावना वरिष्ठ पातळीवर आपण पोहोचवाव्यात अशी आग्रही मागणी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरभीताई भोसले यांनी यावेळी चित्राताई वाघ यांचेकडे आवर्जुन केली.

कार्यक्रमास सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार  छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आवर्जुन उपस्थित राहिले. त्यांच्या हस्ते चित्रा वाघ यांचे माँसाहेब जिजाऊ आणि बालशिवबा यांची प्रतिमा भेट देण्यात येवून सातारकरांच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच महिला भगिनींच्या मनाप्रमाणे सातारा लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार निवडून येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!