महेश शिंदे माहुलीला जाणार का ?
सातारा ( महेश पवार) :
सातारा पंढरपूर मार्गावरील माहुली येथील कृष्णा नदीवरील ब्रिटिशांनी बांधलेल्या शंभरी ओलांडलेल्या पुलावरील वाहतूक धोकादायक ? होत असून या मुदत संपलेल्या पुलाला पर्यायी व्यवस्था होणं गरजेचं आहे , मात्र अनेकदा मागणी करून देखील जिल्हा प्रशासनाने आणी लोकप्रतिनिधी यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे ,यामुळे भविष्यात या ठिकाणी जर कोणती दुर्घटना घडली तर त्यांस जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांसह वाहनधारक करत आहेत . यामुळेच परिसरातील वाहनधारकांच्या मधून आमदार महेश शिंदे माहूलीला जाणार का ? आणि त्या शंभरी ओलांडलेल्या पुलाला नवा पर्याय उभा करणार का ? असा सवाल उपस्थित करत आहेत.
कोरेगाव मतदार संघातून शशिकांत शिंदे दोन वेळा निवडून गेले परंतु त्यांनी देखील या महत्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष केले सध्याचे आमदार महेश शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्याने लोकांना त्यांच्याकडून अपेक्षा होती की ते माहूलीला जाऊन पुलांची सध्याची परिस्थिती पाहतील , आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून या सातारा पंढरपूर मार्गावरील कृष्णा नदीवर गरजेच्या असलेल्या पर्यायी पुलाचे काम मार्गी लावतील .