google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसिनेनामा 

वातावरण बदलावर भाष्य करणारा ‘जागो रे…’

मुंबई:

सध्याच्या काळातील सर्वात स्पष्ट संकट असलेल्या हवामान बदलाच्या कारणांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने टाटा टीने आज # जागो रे ची नवीनतम आवृत्ती सादर केली.

गेल्या काही दशकांमध्ये हवामान बदलाचे परिणाम अभूतपूर्व दिसून येत आहेत. २०२१ मधील सेव्ह द चिल्ड्रनच्या अहवालानुसार जर पृथ्वी सध्याच्या दराने गरम होत राहिली तर गेल्या दशकात आणि त्यानंतर जन्मलेल्या मुलांना आधीच्या पिढ्यांपेक्षा जास्त उष्णतेच्या लाटा, पूर, दुष्काळ आणि वणव्याचा सामना करावा लागेल. युनिसेफच्या याच प्रकारच्या समान अहवालात असे म्हटले आहे की अंदाजे १ अब्ज मुले अशा देशांमध्ये राहतात ज्यांची नोंद हवामान बदलामुळे ‘अत्यंत उच्च-जोखीम’ म्हणून करण्यात आली आहे.

https://www.youtube.com/watch?v=MHXVp859MY

जर आपल्याला आपल्या मुलांच्या भविष्याचे रक्षण करायचे असेल तर हवामान बदलाशी लढा देणे ही आपल्यासाठी महत्वाची गोष्ट बनते.

गेल्या काही वर्षांमध्ये, टाटा टीचे # जागो रे उपक्रम हे ब्रँड आणि प्लॅटफॉर्मसह समाजातील वास्तविक बदलांना प्रेरणा देणारे आणि सामाजिक प्रबोधन सुलभ करण्यासाठी एक स्पष्ट आवाहन बनले आहेत. सध्याच्या आवृत्तीसह, टाटा टीचे # जागो रे चे उद्दिष्ट आहे की हवामान बदलाचा सामान्य नागरिकावर कसा परिणाम होतो आणि त्याचा आपल्या भावी पिढ्यांवर कसा परिणाम होईल हे स्पष्ट करणे. ते वैयक्तिक आणि प्रत्येकाला आपल्याशी संबंधीत आहे असे वाटेल अशा प्रकारे बनवून लोकांच्या वर्तनात लहान छोटे बदल करण्यासाठी आणि हवामान बदलाच्या विरोधात एकत्रितपणे उभे ठाकून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्या वसुंधरेला अधिक चांगले बनविण्यासाठी प्रेरित करण्याची आशा करते.

आपल्या १५ व्या वर्षात टाटा टी जोआगो रे प्लॅटफॉर्म नवीन टीव्हीसी सह प्रशंसनीय अभिनेते पंकज त्रिपाठी यांना घेऊन परत येत आहे. पंकज त्रिपाठी पहिल्या जोगो रे कम्युनिकेशनचाही एक भाग होते. मुलेन लिंटासने तयार केलेली टीव्हीसी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी प्रसिद्ध होत आहे. यामधून ही वस्तुस्थिती दर्शविण्यात आली आहे की काही अंश उष्णतेमुळे आपल्या घरातील आरामात व्यत्यय येऊ शकतो, तरीही आपण वाढत्या तापमानासारख्या हवामानातील व्यत्ययाचा सामना जग करत असताना या वेगाने होत असलेल्या हवामान बदलाबाबत मात्र उदासीन असतो. आपल्याला जागे करण्यासाठी आणि हवामानातील बदलाची कबुली देण्यासाठी चित्रपटाचा मुख्य संदेश मुलाच्या दृष्टीकोनातून दाखविला जातो. त्यामुळे सर्व पालकांना हवामान बदलाविरूद्ध आताच काम केले पाहिजे याची आठवण यातून करून दिली जाते. अन्यथा आपल्या मुलांच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी खूप उशीर होईल.

आपल्यापैकी बहुतेकांना आपल्या बालपणाची आठवण येते ज्यामध्ये घराबाहेर मैदानावरील बाह्य गोष्टींचा खूप मोठा वाटा होता. परंतु पालक म्हणून आपण वाढत्या तापमानामुळे, प्रदूषित वातावरणामुळे आपल्या मुलांना बाहेर पाठवण्याबाबत साशंक असतो. त्यातूनच ‘अपने लिये नाही तो…अपने बच्चोंके फ्युचर के लिए जागो रे’ असे म्हणत वातावरणातील बदल सर्वव्यापी आहेत, समाजाच्या सर्व स्तरांतील कुटुंबांवर यामुळे परिणाम होत आहे यावर या टीव्हीसी मधून प्रकाश टाकण्यात येत आहे. हा जाहिरातपट सर्व नागरिकांना पुढे येण्याची विनंती करतो आणि दररोजच्या छोट्या छोट्या कृतींद्वारे योगदान देऊन हवामान बदलाशी लढा देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन करतो. मायक्रोसाइट (Jaagore.com) व्यक्तींना हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत करू शकणार्‍या लहान-लहान दैनंदिन कृतींबद्दल माहिती देण्याबरोबरच त्यांचे समर्थन करण्याचे आश्वासन देते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!