कामगारांच्या पगारावर डल्ला मारणारा खरा मोरक्या गजाआड होणार का ?
सातारा (महेश पवार) :
महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या पगारातून दरमहा हजार ते बाराशे रुपये बेकायदेशीर कपात केले प्रकरणी सातारा पोलिसांत गुन्हा नोंद झाल्याने खळबळ माजली .
याप्रकरणी सोमनाथ गोडसे व प्रथमेश जाधव यांनी तक्रार देणार्या दिलिप शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद होऊ नये म्हणून बड्या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून पैशाचं आमिष दाखवून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला तर याप्रकरणी वेळोवेळी पाठपुरावा करणारे राष्ट्रमतच्या पत्रकार महेश पवार यांना देखील हे प्रकरण थांबवण्यासाठी एका खाजगी वृत्त वाहिनीच्या पत्रकारामार्फत दमदाटी करत हा विषय थांबविण्यासाठीचा प्रयत्न करण्यात आला . यावेळी कुठल्याही दबावाला आणि अमिषाला बळी न पडता हो नाही करत गुन्हा दाखल करण्यात आला.
महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या एका तक्रारीने जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील झालेले गैरव्यवहार आणि या प्रकरणात सहभागी असणारा बडा राजकीय व्यक्ती आणि मोहरक्या कोण ? हे पोलीस तपासात समोर येणं गरजेचं आहे . तक्रारदार दिलिप शिंदे यांनी तक्रार माघार घ्यावी म्हणून अनेक प्रयत्न करणारा सोमनाथ गोडसे गुन्हा दाखल होणार असल्याची कानकुन लागताच तक्रार दाखल होण्याआधीच फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली , यामुळे या प्रकरणात सोमनाथ गोडसे व साथीदारांना पोलीस अटक कधी होणार?
महावितरण आणि राना ॲग्रोटेक यांचा दूर दूर संबंध नसताना शेकडो कामगारांच्या पगारातून दरमहा ॲटो डेबिट करत कोट्यवधी रुपयांचा मलिदा हडपणार्या सोमनाथ गोडसे व प्रथमेश जाधव यांच्या कंपनीच्या खात्यावरून झालेल्या गैरव्यवहारात कोणाकोणाचा संबंध आहे हे पोलीस तपासात समोर येणं गरजेचं आहे .