‘औंधसह 21 गावांना पाणी देण्याचा विषय अंतिम टप्प्यात’
कराड (महेश पवार) :
औंधसह 21 गाव पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष मांडवे, उपाध्यक्ष धनाजी आमले मेजर, डॉ, विवेक देशमुख,जयवंत मांडवे ,शिवाजी गायकवाड , हनुमंत चव्हाण व आदी मान्यवरांसमवेत मंत्रालयात आयोजित जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर , सचिव नार्वेकर व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
आज उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची सही झाल्यानंतर नवीन योजना असल्याने सदर फाईल राज्यपालांच्याकडे पाठवण्यात आली असून औंधसह 21 गावांची प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यात आली आहे.
औंधसह 21 गावांसाठी पाणी देण्यासंदर्भात विषय त्वरित मार्गी लावणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
औंध पाणी योजनेबाबत कोणतेही प्रयत्न न करता काही विरोधक दिशाभूलीचे राजकारण करत आहेत. या योजनेसाठी आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने पाण्याची उपलब्धतता झाली आहे. अनेक वर्षे सत्ताधाऱ्यांची पाठारखण करुनही विरोधकांना जे शक्य झाले नाही ते आ. गोरेंनी करुन दाखवले आहे. औंधसह वीस गावांना जलनायक आमदार जयकुमार गोरेच पाणी देणार आहेत.