सातारा नगरपालिका लुटून खाल्ली : शिवेंद्रराजे भोसले
सातारा (महेश पवार) :
साताऱ्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आमदार शिवेंद्रराजे यांनी पालेकेच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालिकेच्या कामकाजावरून सातारा विकास आघाडीचा चांगलाच समाचार घेतला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार शिवेंद्रराजे यांनी सातारा पालिकेच्या झालेल्या निवडणुकीत उमेदवारापासून ते भ्रष्टाचार मुक्त कारभार करू असं म्हणत सातारा विकास आघाडीने आणि त्यांच्या नेत्यांनी अतिशय सुंदर स्वप्न सातारकरांना दाखविले मात्र यानंतर सातारा नगरपालिकेत फक्त कॉन्ट्रॅक्ट , कमिशन ,पैसे खाल्ले याशिवाय दुसरं काही केले गेल नाही ,उलट सातारा विकास आघाडीच्या प्रत्येक नगरसेवकाने पालिका लुटून खाल्ली लुटण्यासाठी जणू शर्यतच लागले असं म्हणत आमदार शिवेंद्र राजे यांनी सातारा विकास आघाडी तसेच खासदार उदयनराजे यांच्यावर हल्लाबोल करत चांगलेच तोंडसुख घेतले.