google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

”हा’ तर सरकारचा निष्पाप विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ’


मडगाव :

बाळ्ळी येथे शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बालरथ बसला झालेल्या अपघातात सुमारे 10 विद्यार्थ्यी जखमी झाले आणि इतरांना मानसिक आघात सहन करावा लागला. सदर अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ इव्हेंट मॅनेजमेंटने झपाटलेल्या भाजप सरकारचे गोव्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे संपूर्ण दुर्लक्ष असल्याचे उघड करतो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार निष्पाप विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.


विरोधी पक्षनेते आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी या अपघाताची माहिती मिळताच दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून जखमी विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्याची व्यवस्था केली. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातही त्यांनी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली.


राज्यभरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या सर्व बसेसच्या सेफ्टी ऑडिटचे आदेश तातडीने द्यावेत अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. राज्यातील 1315 शाळांपैकी 663 शाळांचे सेफ्टी ऑडिट करण्यात सरकार अपयशी ठरले असून, सदर शाळांतील विद्यार्थ्यांची सुरक्षा देवाच्या कृपेवर अवलंबून आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसची देखभाल करण्यातही सरकार अपयशी ठरले आहे, असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.


गोव्यात 316 अनुदानित संस्थामध्ये 409 बालरथ कार्यरत आहेत, त्याचप्रमाणे सरकारने सरकारी उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना 87 कदंब बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. आजच्या अपघातासारख्या आपत्कालीन परिस्थितीत उपयोगात येणारे महत्वाचे ट्रॅकिंग डिव्हाइसेस, पॅनिक बटण, आपत्कालीन संपर्क क्रमांक इत्यादि कोणतीही प्रणाली या बसेसमध्ये उपलब्ध नाहीत. प्रत्येक बसवरील ड्रायव्हर आणि कंडक्टरची गुन्हेगारी वृती नसल्याची शहानीशा करणे व त्यांची योग्य माहिती तपासणे देखील गरजेचे आहे. आरटीओ आणि ट्रॅफिक पोलिसांनी भरधाव आणि निष्काळजीपणे वाहने हाकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शाळेच्या वेळेत अधीक सतर्क असले पाहिजे, असे युरी आलेमाव यांनी सूचित केले.


विधानसभेच्या गेल्या अधिवेशनात राज्यातील जीर्ण शाळा इमारतींचा मुद्दा मी उपस्थित केला होता. दुरूस्तीची वाट पाहत असलेल्या शाळांची नूतनीकरणाची कामे हाती घेण्याचे आवाहन मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केले होते. सरकारने विद्यार्थ्यांना सुरक्षा प्रदान करण्यावर सर्वोच्च प्राधान्य देण्याची वेळ आली आहे असे युरी आलेमाव यांनी सांगितले.


इव्हेंट मॅनेजमेंटवर करोडो खर्च करण्याचे वेड लागलेल्या व नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या भाजप सरकारचे आजची ही दुर्दैवी घटना डोळे उघडणारी ठरेल अशी आशा मी व्यक्त करतो. सरकारने फालतू खर्च ताबडतोब थांबवावेत आणि गोमंतकीयांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सदर निधीचा वापर करावा, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!