![congress bjp](https://rashtramat.com/wp-content/uploads/2022/09/1663141906728-780x470.jpg)
…अखेर ‘ते’ आठजण भाजपवासी झाले
पणजी:
गोव्यात अगदी सकाळपासूनच सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. काँग्रेसच्या 8 आमदारांच्या गटाने भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी याची औपचारिक घोषणा केली आहे. यासोबतच भाजपच्या पक्ष कार्यालयात आठही आमदारांचं स्वागत करण्यात आलं आहे.
![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2022/09/1663141908185-1024x576.jpg)
काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे गोव्यात भाजपची ताकद आणखी वाढली आहे. दिगंबर कामत यांनी सलग आठवेळा मडगावमधून विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात काँग्रेस आमदारांनी चर्चा केली. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेस आमदारांच्या गटामध्ये माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यासह अन्य 7 आमदारांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने मायकल लोबो, डिलायला लोबो, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि रुडॉल्फ फर्नांडिस या काँग्रेसच्या आमदारांचा समावेश आहे.