नॉलेज टर्मिनसच्या अध्यक्षपदी युगांक नायक
फोंडा:
गोव्यातील नामवंत आणि एकमात्र ज्ञान महोत्सव असलेल्या नॉलेज टर्मिनसच्या २०२३ ते २०२५ सालासाठीच्या नव्या कार्यकारिणीची निवड आज नागेशी, फोंडा येथे करण्यात आली. या नव्या कार्यकारिणीच्या निवडी सोबतच नॉलेज टर्मिनस झिरो पॉईंट फाईव्ह देखील वाजले आहे गेली दोन वर्ष कोरोनामुळे स्थगित झालेला हा ज्ञान महोत्सव आता लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी सर्वानुमते नॉलेज टर्मिनसचे पहिले अध्यक्ष आणि सल्लागार मंडळ सदस्य, गोवा विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक युगांत नायक यांची नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर प्रसिद्ध तियात्रिस्त, सामाजिक कार्यकर्ते माल्कम डिकोस्ता यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
गोवा इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे माजी सहाय्यक प्राध्यापक सुरज कामत यांची सचिव म्हणून तर प्रसिद्ध गोमंतकीय अभिनेता आणि सूत्रसंचालक रोहित खांडेकर यांची खजिनदार म्हणून यावेळी निवड करण्यात आली.
यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
फिरोज शेख : माजी अध्यक्ष
उर्वशी नाईक सहसचिव
विद्देश पडीयार: सहखजिनदार
सदस्य :
निलिन नाईक, लक्षिता नाईक, तेजस रिवणकर
यावेळी मावळते अध्यक्ष वैभव कळांगुटकर यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या याबैठकीला सल्लागार मंडळ सदस्य युगांक नायक, सुरेल तिळवे, विनय भट यांचे मार्गदर्शन लाभले.