गोवा पंचायत निवडणुका जाहीर; आचारसंहिता लागू
आयोगाने 186 पंचायतीसाठी कार्यक्रम जाहीर केला असून 10 ऑगस्टला मतदान होणार आहे. त्यामुळे शनिवारपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. 10 तारखेला मतदान व 12 ऑगस्टला मतमोजणी घेण्यात येणार आहे. 18 ते 27 अर्ज स्वीकारले पंचायत निवडणुकीसाठी यापूर्वीच वर्गीकृत जाती-जमाती, इतर मागासवर्गीय वर्गाच्या आरक्षणाच्या मुद्याने बराच वेळ हा मुद्दा न्यायलायत प्रलंबित होता. मात्र आता हा मुद्दा निकालात निघाला असून 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मतमोजणीने या निवडणूकिचे चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने या बाबत आज अधिकृत घोषणा केली आहे. त्यामूळे या निर्णयाने आगामी पंचायत निवडणुकीच्या अगोदर ग्राम पंचायत क्षेत्रांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. त्यामूळे आता नेत्यांना मतदान होईपर्यंत मतदारांना अमिष दाखवणाऱ्या घोषणा करता येणार नाहीत.
राज्यात गाजत असलेल्या पंचायत निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळणार की नाही ? याबाबत अनेक प्रश्न असताना राज्य सरकारने सादर केलेला इतर मागासवर्गीयांचा (ओबीसी) डाटा ग्राह्य म्हणून राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींना या निवडणुकांमध्ये आरक्षण देण्याचे तत्वतः मान्य केले आहे.
त्या संबंधाची अधिसूचना उद्या निघू शकते. या ओबीसी आरक्षणासाठी 19 पोटजातींची अधिसूचना आज पंचायत संचालनालयांने काढली. पंचायत निवडणुकांची घोषणा 17 किंवा 18 जुलै रोजी होईल अशी माहिती निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून मिळाली आहे.