google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

बुलेट विसरा, प्रवाशांना लेट होतोय त्यावर बोला : मिशेल

मडगाव : 

भाजप सरकारच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापनात गेल्या 10 वर्षातील पूर्ण अपयशामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत, पावसात आणि उन्हाळ्यात त्रास सहन करणाऱ्या प्रवाशांचे हाल दाखवणाऱ्या बातम्यांचा हा व्हिडिओ आहे. बुलेट विसरा आणि प्रवाशांना लेट होतो त्यावर बोला, अशी मागणी काँग्रेस नेत्या मिशेल रिबेलो यांनी केली आहे.


भाजपच्या दक्षिण गोव्यातील उमेदवार पल्लवी धेंपे यांनी प्रसारित केलेल्या बुलेट ट्रेनच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो यांनी गोव्यातील विविध रस्त्यांवर बंद पडणाऱ्या कदंबा बसेसच्या  व्हिडिओ पोस्ट केला आहे.


भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांची सोशल मीडिया हाताळणाऱ्या  भाजपच्या टीमने  अवास्तव दाखविणारे पोस्ट टाकू नयेत. असे केल्याने पल्लवी धेंपेनाच मनस्ताप सहन करावा लागेल असा टोला मिशेल रिबेलो यांनी हाणला आहे. सूर्य आणि चंद्र आणून देण्याचे आश्वासन देण्यापूर्वी तिने जमिनीवरील वास्तवाचा अभ्यास केला पाहिजे असे मिशेल रिबेलो यांनी पूढे म्हटले आहे.


भाजप टीमने तिच्या हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे जो एक प्रकारे “महिला शक्ती” वर शंका घेतो. त्याचवेळी सदर व्हिडिओ धावत्या ट्रेनच्या डब्यात चढण्यासाठी देखील प्रोत्साहन देतो. मोदींना सुपरमॅन म्हणून दाखवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते याचे हे उदाहरण आहे. मोदींची हमी हमीशिवाय आहे, असा टोला मिशेल रिबेलो यांनी हाणला आहे.


भाजप सरकारच्या गेल्या दहा वर्षांतील अयशस्वी धोरणांमुळे जनतेला भोगाव्या लागलेल्या त्रासाबद्दल पल्लवी धेंपे बोलल्या तर मला त्याचे कौतुक वाटेल. प्रचार करताना त्यांनी सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करावा आणि लोकांच्या त्रासाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. मला आशा आहे की भाजप टीम पल्लवी धेंपेना ही संधी देईल, असे मिशेल रिबेलो यांनी सांगितले.


कदंब  महामंडळाच्या बसेसची खरोखरच खेदजनक स्थिती आहे. बसेस रोज आलटून पालटून बंद पडतात पण सरकारला त्याची पर्वा नाही. आगामी निवडणुकीत जनता भाजपला धडा शिकवेल, असे मिशेल रिबेलो यांनी म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!