गोवा

काँग्रेसच्या ‘त्या’ पाच आमदारांना चेन्नईला हलवले

पणजी :
गोवा काँग्रेसमध्ये गेले काही दिवस नाराजी नाट्य सुरु आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिगंबर कामत यांनी याबाबत आपली नाराजी स्पष्ट केली होती. यातच आता गोवा काँग्रेसच्या पाच आमदारांना चेैन्नईला हलवल्याने या दौऱ्यावरुन गोव्यातील राजकिय पटालावर चर्चेला उधान आले आहे.

चेन्नईला हलवलेल्या पाच आमदारांमध्ये संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, रुडॉल्फ फर्नांडिस, एल्टन डिकॉस्टा आणि कार्लोस फेरेरा या 5 आमदारांचा समावेश आहे. त्यांना चेन्नईला हलवले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत काँग्रेस नेत्यांना विचारले असता. सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमदारांनी भाजपशी संधान न साधता काँग्रेसशी निष्ठा कायम राखावी यासाठी गोवा काँग्रेसने ही अधिकची काळजी घेतली आहे. अशी माहिती समोर आली आहे.

गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांच्याशी महत्त्वाची चर्चा करावयाची असल्याने आम्हाला चैन्नई दौरा करावा लागला. अशी माहिती देण्यात आली आहे. असे असले तरी काही नेत्यांनी याबाबत खाजगीत बोलताना गोवा काँग्रेसमध्ये सुरु असलेली धुसफूस अद्याप संपलेली नाही. सर्वच नेत्यांना पक्षातील अंतर्गतबाबींवर आक्षेप असल्याचं म्हटले आहे. त्यामूळे या नेत्यांशी चर्चा करुन चर्चेने मार्ग काढला जाणार असल्याचं सांगितले जात आहे. मात्र या निमित्ताने गोवा काँग्रेसमधील अंतर्गत अद्याप संपवली नसल्याचं स्पष्ट झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!
%d bloggers like this: