हणजूणात 1 लाखाच्या अमली पदार्थासह एकाला अटक
आज सकाळपासून अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन मोठ्या कारवाया पोलिसांनी केल्या आहेत. पहिल्या कारवाईत मडगाव येथे महिलेसह पाच लाखाचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यानंतर हणजूण येथे बिहारच्या युवकाला गांजा बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हणजूण येथे एक व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना लागली होती. यावरुन पोलिसांनी मडगाव येथून अजितकुमार गुप्ता (28) या युवकाला अटक केली आहे. संशयित गुप्ता हा ग्राहकांना ड्रग्ज देण्यासाठी आला असता त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे.
पोलिसांनी आज दिवसभरात दुसरी कारवाई केली आहे. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाई सुरु ठेवली आहे. राज्यातील वाढती गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. या पुढे अवैध प्रकार चालणार नाहीत. असा स्पष्ट इशारा गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांच्या पोलिस अधिक्षकांनी पत्रकार परिषद घेत काही दिवसांपुर्वीच दिले आहेत. त्यामुळे अशा कारवाई आता सुरु राहणार आहेत.