जुळ्या बहिणींशी विवाह करणं पडलं महाग…
दोन दिवसांपूर्वीच अकलूजमध्ये दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह होता. या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असताना त्यांच्या आनंदावर आता विरजण पडण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे जुळ्या बहिणींशी विवाह करणाऱ्या अतुल अवताडेंविरोधात अकलूजमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२ डिसेंबर रोजी अकलूजमध्ये अतुल अवताडे या तरुणाने रिंकी-पिंकी या जुळ्या बहिणींनी विवाह केला होता. अतुलच्या कुटुंहबियांनीही या विवाहास मान्यता दिली होती. अतुलचे बहुतांशी नातेवाईक अकलूज परिसरात राहतात. त्यामुळे त्याचा हा अनोखा विवाह सोहळा अकलूजमधल्या गलांडे हॉटेलात पार पडला होता.
दरम्यान, याप्रकरणी अतुलविरोधात भादंविच्या कलम ४९४ अन्वये अकलूज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अकलूजचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशमुख यांनी दिली आहे.
रिंकी आणि पिंकी या दोन्ही जुळ्या बहिणी आपल्या वडिलांच्या पश्चात विधवा आईसह मुंबईत एकत्र राहत होत्या. एकेदिवशी आईसह दोन्ही जुळ्या बहिणी आजारी पडल्या. त्यांना अतुल याने रूग्णालयात दाखल केले होते. टॕक्सी वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या अतुल याने दोन्ही रिंकी आणि पिंकीसह त्यांच्या आईला आजारपणात केलेली मदत मोलाची होती. घरात पुरूष नसल्यामुळे अतुल आधार बनला होता. दरम्यान, दोन्ही जुळूया बहिणींपैकी एकीचा अतुलवर जीव जडला. ही बाब दुसऱ्या बहिणीच्या लक्षात आली. दोघीही एकमेकांच्या शिवाय जगूच शकत नव्हत्या. एकीने अतुलशी विवाह केल्यास दुसरीचे जगणे मुश्किलीचे ठरणार होते. म्हणून दोघींही अतुल याच्याशी एकत्रित विवाह करण्याचा निर्णय घेतला. आईनेही दोन्ही जुळ्या मुलींच्या भावना आणि अतुलची सेवाभावी वृत्तीही विचारात घेऊन त्याच्या एकट्याशीच दोन्ही जुळ्या मुलींना विवाह करण्यास संमती दिली होती.