‘मनशुद्धीसाठी आचारावा ‘हा’ मार्ग’
जांबावली :
आजच्या युगात हवा, पाणी तसेच इतर अनेक गोष्टींचे शुद्धीकरण करण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्द आहे, परंतू मनशुद्धीकरणासाठी अजुनही तंत्रज्ञान विकसीत झालेले नाही. आपल्या मनाचे शुद्धीकरण हे श्लोक पठण व परमेश्वर भक्तीनेच होते असे प्रतिपादन श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जिवोत्तम मठाधिश श्रीमद् विद्याधीशतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराजांनी केले.
जांबावली येथील श्री दामोदर संस्थानात आयोजीत शिखरकलश प्रतिष्ठापना सुवर्ण महोत्सवात महारुद्र, महाविष्णू, शतचंडी महायज्ञांच्या महापुर्णाहुतीस उपस्थित राहिल्यानंतर केलेल्या आशिर्वचनात स्वामी महाराजांनी विधीवत सर्व देवकृत्ये तसेच इतर नियम व संकेत पाळल्याबद्दल श्री रामनाथ दामोदर संस्थान समितीचे कौतूक केले व संस्थानाची भरभराट होवो असा आशिर्वाद दिला.
आजच्या पिढीने आपल्या पुर्वजांचे स्मरण करणे गरजेचे असून, आई-वडील व पुर्वजांचे आशिर्वाद लाभल्यासच माणसाची भरभराट होते व त्यांना वैभव प्राप्त होते. आपले कुलदेव, गुरूवर्य, पुर्वज यांचे नित्यस्मरण केल्यानेच मनुष्यास पुण्य प्राप्ती होते असे स्वामी महाराजांनी सांगितले.
दुपारी पर्तगाळी येथून स्वामीजींचे आगमन झाल्यानंतर मंगलवाद्यांसह गोकर्ण पर्तगाळ मठाधिशांचे स्वागत करण्यात आले. पुर्णकूंभ, सुहासीनीची दीप आराधना स्विकारून स्वामींनी देवदर्शन घेतले. त्यांनतर श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महारांजांच्या उपस्थितीत देव दामोदराचे पालखीतून यज्ञ मंडपात आगमन झाले. विवीध धार्मीक विधी पार पाडल्यानंतर महापूर्णाहुती झाली.
श्री रामनाथ दामोदर संस्थानतर्फे नेमस्त राहुल प्रभू खोपे यांनी साईश हेगडे, गणाधिश शेणवी कुंदे, मंजुनाथ पै दुकळे व महेश नायक यांच्या उपस्थितीत श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांची पाद्यपूजा केली. यावेळी संस्थान समितीचे अमेय भोबे, गजानन कुंदे, अमित हेगडे, अतिश दुकळे तसेच थळकार साईश रत्नाकर जांबावलीकर उपस्थित होते.
श्री दामोदर संस्थानचे अध्यक्ष मंजुनाथ पै दुकळे यांनी आपल्या स्वागतपर भाषणांत स्वामी महाराजांच्या उपस्थितीत आपल्या अध्यक्षतेखाली धार्मिकविधी संपन्न होणे हे माझ्या आई-वडिलांचे आशिर्वाद व पुर्वजांची पुण्याईच असल्याचे प्रतिपादन केले व उत्सव आयोजित करण्यास हातभार लावलेले कुमठेकर, हेगडेकर, स्थानीक ग्रामस्थांचे आभार मानले.
सहा दिवसीय महोत्सव आयोजित करण्यासाठी सिद्धेश प्रभुदेसाई, भावेश जांबावलीकर तसेच जांबावली गांवचे रहिवाशी यांनी हातभार लावल्याचे मंजुनाथ दुकळे यांनी सांगितले.
संस्थानात आयोजित केलेल्या पिंडीका शतकमहोत्सव व शिखरकलश प्रतिष्ठापना सुवर्ण महोत्सवात, निस्वार्थीपणे देवकृत्यांसाठी सेवा देणारे बाळू भटजी तसेच सांस्कृतीक व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात सेवा देणारे विशाल पै काकोडे यांचा प.पू. विद्याधीशतीर्थ स्वामीच्या हस्ते शाल, सोवळे तसेच श्री दामोदराची प्रतिमा देवून चौकावर सन्मान करण्यात आला.
आजच्या कार्यक्रमाला गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र तसेच इतर भागांतून शेकडो भावीक उपस्थित होते. मंदिरात देव दामोदर व लक्ष्मिनारायणाच्या मूर्तिसमोर केलेले पुष्परचनेचे मखर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. रात्रौ गौतमी हेदे बांबोळकर व अक्षय नाईक यांचा “स्वर बरसात” हा संगीताचा बहारदार कार्यक्रम पार पडला. त्यांनतर आरती, प्रसाद झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.