google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

कराड येथील सॉ मिलला भीषण आग

कराड (अभयकुमार देशमुख):

कराड शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भेदा चौक येथील लक्ष्मी सॉ मिलला मध्यरात्री भीषण आग लागली. रात्री २ वाजता लागलेली ही आग पहाटे 6 वाजता आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले.

या आगीत लाकडांसह वखारीतील मशीनरीही जळून खाक झाल्या आहेत. या घटनेत वखार मालकाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.


वखारीला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झालल्या. अथक प्रयत्नानंतर पहाटे सहा वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!