google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
Homeक्रीडागोवा

‘काय’ आहेत राज्यातील क्रीडा सुविधेवर आपचे प्रश्न ?

आम आदमी पक्षाचे (आप) नेते वाल्मिकी नाईक यांनी राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधांच्या अभावावर भाजप सरकारवर टीका केली आहे. भाजप सरकार दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करण्याऐवजी क्रीडा क्षेत्रात पक्षपात आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यात दंग आहे.

शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाईक म्हणाले, “राज्यातील खेळाडूंमध्ये क्षमता असताना, भाजप सरकार आवश्यक ते सहकार्य करण्यात अपयशी ठरले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आले मात्र यातून एक सुद्धा कायमस्वरूपी क्रीडा पायाभूत सुविधा भाजप सरकारला उभारता आले नाही. याहून मोठे अपयश काय आहे”.

‘आप’ने यापूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होण्यापूर्वी निविदा प्रक्रियेतील अनियमितता उघडकीस आणली होती आणि निवडलेल्या खासगी संस्थेच्या अक्षमतेवर प्रकाश टाकला होता. भाजप सरकारने याच खासगी संस्थेला निविदा जारी केल्यामुळे निकृष्ट दर्जाचे केटरिंग, वाहतूक आणि निवास यांचा सामना खेळाडूंना करावा लागला. योग्य व्यवस्थेच्या अभावामुळे अनेकांना स्वतःची व्यवस्था स्वतः करावी लागली.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धादरम्यान, मुसळधार पावसामुळे तात्पुरत्या सेटअपचे देखील नुकसान झाले. परिणामी अनेक खेळाडूंना त्रास झाला. काही खेळ एका तंबूत अंधारात आयोजित केले गेले होते, तर दुसर्‍या तंबूत एसी काम करत नव्हते. केटरर्सना जेवणाची सोय करताना अडचणींचा सामना करावा लागला.

वाल्मिकी नाईक म्हणाले, “भाजप सरकारचा अपयश मागील दोन आठवड्यापासून नाही आहे तर याला आठ वर्षांचा इतिहास आहे. जेव्हा गोव्यला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे यजमानपद भूषविण्याची घोषणा करण्यात आली, तेव्हा जबाबदारी घेण्याची इच्छाशक्तीचा अभाव होता. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या 10 कोटी दंडाच्या चेतावणीला प्रतिसाद म्हणून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी शेवटच्या क्षणी व्यवस्था करण्यात आली होती. इतकेच नाही तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भाजप सरकारमधील प्रमुख नेत्यांना बाजूला सारण्यात आले होते. यावरून भाजप आपल्याच पक्षातील प्रभावशाली बहुजन व्यक्तींसोबत कसे वागतात हे लोकांना कळून चुकले आहे”.

आपचे प्रदेश उपाध्यक्ष संदेश तेलेकर देसाई यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा ऑडिट अहवाल मागवला असून, तो जनतेसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. भारताचे माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनखर प्रमुख पाहुणे असतानाही प्रेक्षकांची संख्या खूपच कमी होती. राष्ट्रीय खेळांच्या समारोप समारंभासाठी प्रेक्षक व्यवस्था करण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याची टीका तेलेकर यांनी केली.

सरकारला राष्ट्रीय खेळांबाबत दोन वर्षे अगोदर माहिती असतानाही कायमस्वरूपी पायाभूत सुविधा का निर्माण केल्या नाहीत, असा सवाल तेलेकर यांनी केला. कायमस्वरूपी पायाभूत सुविधा निर्माण केल्या असत्या तर आज गोव्याचे खेळाडू राज्यासाठी 250-300 पदके मिळवू शकले असते.

आपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील सिगणापूरकर यांनी सर्कसच्या तंबूसारख्या संरचनेत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल गोवा भाजप सरकारवर टीका केली. केंद्र सरकार कायमस्वरूपी सुविधा निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्प उपलब्ध करून देत राष्ट्रीय खेळांचे आयोजन ही चांगल्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी महत्त्वाची संधी होती. याला केंद्र सरकार निधी उपलब्ध करून देत असल्याने यानिमित्ताने राज्यातही उत्तम क्रीडा पायभूत सुविधा उभारता आले असते. मात्र, प्रमोद सावंत सरकारने ही संधी गमावली आणि तात्पुरते तंबू, नूतनीकरणाच्या नावाने सिव्हिल वर्क आणि वरवरची पेंटिंगवर मोठी रक्कम वाया घालवली

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!