google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

सुधीर केरकर यांची अचानक बदली का?; काँग्रेसचा खडा प्रश्न

पणजी :

पर्वरी येथील गृहनिर्माण मंडळाच्या भूखंडावर नरकासूर स्पर्धा आयोजित करण्यासाठी गोवा गृहनिर्माण मंडळाने पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांना आवश्यक परवानगी दिल्याचे गृहनिर्माण मंत्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट करावे तसेच गृहनिर्माण मंडळाचे एमडी सुधीर केरकर यांची अचानक बदली करण्याचे कारण काय? यावर उत्तर द्यावे अशी मागणी काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

पर्वरी  येथील गोवा गृहनिर्माण मंडळाच्या भूखंडावर पर्यटन खात्याने बेकायदेशीरपणे नरकासूर स्पर्धा आयोजित केल्याचा आरोप करून अमरनाथ पणजीकर म्हणाले की, सदर स्पर्धेला गोवा गृहनिर्माण मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी परवानगी नाकारली आणि त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली.

मला समजते की ही जमीन गोवा गृहनिर्माण मंडळाच्या मालकीची आहे जी एका खाजगी कंपनीला लिलाव करण्यात आली होती आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याच कारणाने हाऊसिंग बोर्डाच्या एमडींनी कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी नाकारली, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.

बेकायदेशीर नरकासून स्पर्धा रोखण्यासाठी देवाने गृहनिर्माण मंत्री सुदिन ढवळीकर यांना चांगली संधी दिली आहे. यामुळे नरकासूर स्पर्धा आयोजित करण्यावर होणारा सरकारी पैसाही वाचेल असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

सुदिन ढवळीकर यांनी मगोचे आमदार तथा गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष जीत आरोलकर यांना हस्तक्षेप  करण्यास सांगून गृहनिर्माण मंडळाच्या न्यायप्रविष्ट जागेत आयोजित नरकासूर स्पर्धा आयोजित करण्याचे बेकायदेशीर कृत्य थांबवावे, अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!