
‘अशी’ आहे ‘परिक्रमा 0.6’ची नवी कार्यकारिणी…
फोंडा :
राज्याचा ज्ञानमहोत्सव म्हणून प्रख्यात असलेल्या ‘परिक्रमा नॉलेज टर्मिनस’च्या सहाव्या आवृत्तीचे आयोजन 20 आणि 21 जानेवारी 2024 रोजी करण्यात आली आहे. या आवृत्तीच्या कार्यकारीणीची नुकतीच घोषणा करण्यात आली.
परिक्रमा नॉलेज टर्मिनस 0.6 च्या कार्यकारीणीच्या प्रमुख सचिवपदी भरतनाट्यम प्रवर्तक आणि संशोधिका सुविधा नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सामाजिक कार्यकर्ते आणि नाट्य कलाकार गुरुदास येसू नाईक यांची कार्यक्रम संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

परिक्रमा नॉलेज टर्मिनसचा शैक्षणिक मंच असलेल्या ‘अकॅडमी फोरम’चे 06 आणि 07 जानेवारी रोजी फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिर येथे होणार आहे. अकॅडमी फोरम’च्या सचिवपदी तेजस रिवणकर यांची, तर विनित कुंडईकर यांची संघटन सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.