मडगाव : भाजप सरकारने राज्य प्रशासनात आपल्या “मिशन ३० टक्के कमिशन” ने भ्रष्टाचार व गैरकारभारास उत्तेजन दिल्यानेच राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन गुजरातकडे गेले. भारतीय ऑलिंपीक संघटनेचा हा निर्णय म्हणजे सदर स्पर्धांसाठी लागणाऱ्या साधनसुवीधा मागील दहा वर्षात पुर्ण करु न शकलेल्या तथाकथीत डबल इंजीन भाजप सरकारला बसलेली सणसणीत चपराक आहे अशी बोचरी टीका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष व आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.
राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेसाठी सरकारने हाती घेतलेल्या प्रत्येक प्रकल्पात प्रचंड भ्रष्टाचार होता व त्यामुळे सर्व प्रकल्पांच्या कामाचा दर्जा खालावला. सरकारने स्टेडियम व क्रिडा प्रकल्पांच्या दुरूस्थीवर कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला. भाजपचा भ्रष्टाचार फातोर्डातील नेहरु स्टेडियमवरील ३०० पत्रे वाऱ्याने उडुन गेल्यानंतर निसर्गानेच उघडकीस आणला. त्यानंतर सदर स्टेडियमचे एक छप्पर कोसळले याची आठवण युरी आलेमाव यांनी करुन दिली.
राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांसाठी पेडणे, नावेली येथे उभारलेल्या प्रकल्पांत आताच अनेक समस्या उघड दिसत आहेत. कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे स्पष्ट आहे. सरकार पणजीचा जलतरण प्रकल्प वेळेत पुर्ण करु शकला नाही. मडगावचा स्विमींग पुल कित्येक वर्षे बंद आहे. भाजप सरकारने खेळाडुंना प्रशिक्षण देण्यासाठी योग्य प्रशिक्षकांची सुद्धा नेमणुक केली नाही. भाजप सरकारकडुन क्रिडा स्पर्धांत आयोजक राज्य म्हणुन प्रभावी कामगीरी करण्यासाठी कसलीच तयारी नव्हती. त्यामुळे एका अर्थाने सदर स्पर्धा गुजरातला नेल्याने गोव्याची लाज राखली असा टोला युरी आलेमाव यांनी हाणला.
भाजप सरकारने राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांच्या नावाने अनेक कार्यक्रम आयोजित करुन त्यावर करोडो खर्च केले व मलिदा लाटला. माजी क्रिडामंत्र्यांनी तर “मिशन ३० टक्के कमिशन” ने भाजपला नवी ओळख दिली. राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेच्या एकंदर खर्चाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.
भाजप सरकारने राज्य प्रशासनात आपल्या “मिशन ३० टक्के कमिशन” ने भ्रष्टाचार व गैरकारभारास उत्तेजन दिल्यानेच राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन गुजरातकडे गेले. भारतीय ऑलिंपीक संघटनेचा हा निर्णय म्हणजे सदर स्पर्धांसाठी लागणाऱ्या साधनसुवीधा मागील दहा वर्षात पुर्ण करु न शकलेल्या तथाकथीत डबल इंजीन भाजप सरकारला बसलेली सणसणीत चपराक आहे अशी बोचरी टीका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष व आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.