एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री
मुंबई:
भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना आश्चर्यचकित करणारी घोषणा केली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील असे फडणवीस म्हणाले आहेत.
“आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजप आणि १६ अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला आहे. आणखी काही सोबत येत आहे. भाजपाने हा निर्णय़ केली आहे, आण्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लाढाई आहे, भाजपाने हा निर्णय केला, की शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचच शपधविधी होईल,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.