google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

कासेगाव जवळील भीषण अपघातात कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

कराड (अभयकुमार देशमुख):

राष्ट्रीय महामार्गवर कासेगाव जवळ कार व कंटनेरचा भीषण अपघात.. अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला असून, यात कारचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. जयसिंगपूर कडे जाताना हा अपघात झाला.

कराड तालुक्यातून पुढे गेल्यानंतर काही अंतरावर कासेगावजवळ हा भीषण अपघात शनिवारी 4 वाजण्याच्या सुमारास झाला आहे. अपघातातील मृत जयसिंगपूर येथील आहेत. अरिंजय आण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरु अभिनंदन शिरोटे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

याबाबत कासेगाव पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कारमधून मृत कुटुंब पिंपरी – चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले होते. यावेळी कासेगावजवळील येवलेवाडी फाटा येथे कार रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडकली. या अपघातात कारमधील 5 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 2 जागेवर तर 3 जण उपचारासाठी दवाखान्यात दाखल करताना मृत्यू पावले.

कासेगावजवळ येथे चारचाकी झालेल्या अपतातील कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. गाडीचा वरील टप व दरवाजे पूर्णपणे तुटलेले होते. वरचा भाग पूर्णपणे उडाला होता. तर आतील सिटचा भागही तुटलेला होता. रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!