![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2022/12/IMG-20221213-WA0004-780x470.jpg)
विनोद चव्हाण यांनीच दिले ‘ते’ फिटनेस प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश..!
सातारा (महेश पवार)
सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मार्फत देण्यात आलेल्या त्या 56 फिटनेस संदर्भात राष्ट्रमतने सवाल उपस्थित केला होता.
दरम्यान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी झालेला प्रकार हा तत्कालीन कार्यालय प्रमुख यांच्या आदेशाने झाल्याचे खुलासात म्हटले होते. तसेच सप्टेंबर 2021 च्या आदेशापूर्वी अशा प्रकारचे कामकाज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले नसल्याचा खुलासा त्यांनी केला.
परंतु विनोद चव्हाण यांनीच ‘त्या” दिलेल्या फिटनेस जारी करण्याचा आदेश दिल्याचा पुरावा राष्ट्रमतच्या हाती लागला आहे.
![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2022/12/img-20221213-wa00034797131323944197093-768x1024.jpg)
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण हेच कार्यालय प्रमुख असून या कार्यालयात सुरू असलेल्या ऑनलाईन पद्धतीने चालणाऱ्या सिस्टिम चे एडमिन हे या कार्यालयाचे प्रमुख असतात. या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यी ड्युटी लावण्याचं काम हे कार्यालय प्रमुख असलेले एडमिन करत असतात.
दरम्यान रोडवेज सोलुशन इन्फ्रा कंपनीच्या गाड्यांचे फिटनेस प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश देखील विनोद चव्हाण यांनी दिल्याचे पुरावे राष्ट्रमत च्या हाती लागले असून यात विनोद चव्हाण यांनीच फिटनेस प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश दिले समजते.
![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2022/12/img-20221213-wa00014678037675521957679-768x1024.jpg)
यामुळे विनोद चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही तत्कालीन कनिष्ठ लिपिक श्रीनिवास घोडके यांना देखील अधिकार नसताना (मोटर वाहन कायदा १९८८च्या कलम २१३ नुसार नियुक्त झालेला अधिकारीच म्हणजेच तांत्रिक अर्हता असलेला कमीत कमी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक किंवा त्या वरचा अधिकारीच काम करु शकतो (मोटर वाहन तपासणी व योग्यता प्रमाणपत्रांचे नुतनीकरण) दिल्याने रायबा आणि साहेबांच्या कामकाजाची परिवहन आयुक्त चौकशी करणार का ? असा सवाल जनता विचारत आहे.
![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2022/12/img-20221213-wa00027597253645521058739-768x1024.jpg)
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणासंदर्भात विनोद चव्हाण यांची अधिकृत प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने वारंवार पाठपुरावा करून देखील विनोद चव्हाण यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.
![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2022/12/img-20221213-wa00043896545931510703392-1024x386.jpg)